पुण्यातील आंबेगाव खुर्द परिसरात असणाऱ्या सिंहगड महाविद्यालयात एका टोळक्यानं तुफान राडा घातला आहे. सराईत आरोपीसह काही जणांनी महाविद्यालयातील एका तरुणाला बेदम मारहाण केली आहे. महाविद्यालयात ‘ट्रॅडिशनल डे’ साजरा होत असतानाच हा प्रकार घडल्याने महाविद्यालयाच्या आवारात दहशत पसरली होती. याप्रकरणी भारती विद्यापीठ पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल केला असून चार संशयित आरोपींच्या मुसक्या आवळल्या आहेत.

विकास उर्फ विकी जितेंद्र चावडा (वय २९, रा. जाधवनगर, वडगाव बुद्रुक), साहील प्रमोद गायकवाड (वय १९, रा. निवृत्तीनगर, वडगाव बुद्रुक), चेतन संतोष थोरे (वय १९, रा. चरवड वस्ती, वडगाव बुद्रुक) आणि मोहन धर्मा राठोड (वय १९, रा. पठाण वस्ती, वडगाव बुद्रुक) असं अटक करण्यात आलेल्या आरोपींची नावं आहेत. याप्रकरणी पोलिसांनी अन्य सहा साथीदारांविरोधातही गुन्हा दाखल केला आहे.

Ragging on two postgraduate students at BJ Medical College in Pune print news
धक्कादायक! पुण्यातील बी.जे. वैद्यकीय महाविद्यालयात पदव्युत्तरच्या दोन विद्यार्थिनींवर ‘रॅगिंग’
Suicide student
जळगावात परिचारिका महाविद्यालयातील विद्यार्थिनीची आत्महत्या
Nursing student commits suicide in hostel
नागपूर : धक्कादायक! नर्सिंगच्या विद्यार्थिनीची वसतिगृहातच आत्महत्या
Suicide attempt of college girl due to harassment incident in Bharti University campus
छेडछाडीमुळे महाविद्यालयीन युवतीचा आत्महत्येचा प्रयत्न, भारती विद्यापीठ परिसरातील घटना

अथर्व चौधरी असं मारहाण झालेल्या १९ वर्षीय फिर्यादी तरुणाचं नाव आहे. तो धनकवडी परिसरातील रहिवासी असून सिंहगड महाविद्यालयात शिक्षण घेतो. घटनेच्या दिवशी फिर्यादीच्या महाविद्यालयात ट्रॅडिशनल डे साजरा करण्यात येत होता. दरम्यान सराईत गुन्हेगार विकास चावडा आणि त्याचे साथीदार महाविद्यालयाच्या आवारात घुसले. त्यांनी अथर्वच्या मोबाइल क्रमांकावर फोन करून त्याला बोलावून घेतलं.

यानंतर त्यांनी अथर्वला दमदाटी करण्यास सुरुवात केली. ‘मी कॉलेजचा भाई आहे. तू आमचं ऐकत नाहीस ’ असं म्हणत आरोपी चावडा आणि त्याच्या साथीदारांनी अथर्वला बेदम मारहाण केली. ऐन ट्रॅडिशनल डेच्या दिवशी ही घटना घडल्याने परिसरात खळबळ उडाली होती. या घटनेनंतर सर्व आरोपींनी घटनास्थळावरून पळ काढला. याप्रकरणी अथर्वने भारती विद्यापीठ पोलीस ठाण्यात फिर्याद दाखल केली. फिर्याद दाखल होताच पोलिसांनी तातडीने कारवाई करत चार आरोपींच्या मुसक्या आवळल्या आहेत. या घटनेचा पुढील तपास पोलीस उपनिरीक्षक वर्षा घोगरे करत आहेत.