पुणे : पुणे जिल्हा परिषदेचे नवीन ८२ गट आणि पंचायत समित्यांच्या १६४ गणांची रचना विभागीय आयुक्त सौरभ राव यांनी निश्चित केली आहे. प्रारूप गट व गणांबाबत प्राप्त झालेल्या १५० पैकी १२७ हरकती फेटाळण्यात आल्या आहेत. केवळ २३ हरकती स्वीकारण्यात आल्या असून या हरकतींनुसार काही गट व गणांच्या प्रारूप रचनेत किरकोळ बदल करण्यात आले आहेत. विभागीय आयुक्त सौरभ राव यांच्या आदेशानुसार जिल्हाधिकारी डॉ. राजेश देशमुख यांनी सोमवारी गट व गणांची अंतिम रचना प्रसिद्ध केली. जिल्हाधिकारी डॉ. देशमुख यांनी २ जून २०२२ ला गट व गणांची प्रारूप रचना जाहीर केली होती. या प्रारूप रचनेबाबत जिल्ह्यातील नागरिकांकडून ८ जूनपर्यंत हरकती, सूचना मागविण्यात आल्या होत्या. यानुसार १५० हरकती व सूचना जिल्हा प्रशासनाकडे प्राप्त झाल्या होत्या. या हरकती व सूचनांवर विभागीय आयुक्त राव यांनी १६ जून २०२२ ला सुनावणी घेतली होती. या सुनावणीत त्यांनी प्रत्येक हरकतींबाबत दोन्ही बाजूंचे म्हणणे ऐकून घेतले होते. सुनावणी पूर्ण झाल्यानंतर २२ जूनपर्यंत हरकतींवर निर्णय घेण्यास मुदत होती. त्यानुसार ही प्रक्रिया पूर्ण करून आता अंतिम रचना निश्चित झाली आहे. त्यामुळे आता जिल्हा परिषद व पंचायत समित्यांच्या प्रभागांचे संवर्गनिहाय आरक्षण जाहीर करण्याचा मार्ग आता मोकळा झाला आहे.

या बातमीसह सर्व प्रीमियम कंटेंट वाचण्यासाठी साइन-इन करा
Pune News (पुणे न्यूज), Maharashtra News, Marathi News (मराठीतील बातम्या) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.
Web Title: Groups of pune zilla parishad groups of panchayat samiti pune print news zws
First published on: 27-06-2022 at 17:23 IST