लोकसत्ता प्रतिनिधी

पुणे : बनावट कंपनीच्या नावे कागदपत्रे सादर करून पाच ते आठ हजार कोटी रुपयांचा वस्तू आणि सेवा कर (जीएसटी) कर चुकविण्यात आल्याचा प्रकार उघडकीस आला आहे. वस्तू आणि सेवा कर विभागाच्या पुणे कार्यालयाने ही कारवाई केली असून, कोरेगाव पार्क ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. कर चुकवेगिरी प्रकरणाचा मुख्य सूत्रधार गुजरातमधील असल्याचे तपासात उघडकीस आले असून, त्याला अटक करण्यात आली आहे. याप्रकरणी आठजणांविरुद्ध गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

What Sarangi Mahajan Said?
Sarangi Mahajan : सारंगी महाजन यांचा आरोप; “धनंजय आणि पंकजा मुंडे या दोघांनी माझी जमीन लाटली, आणि..”
CM Devendra Fadnavis on LOP
CM Devendra Fadnavis on LOP: विधानसभेत विरोधी पक्षनेतेपद…
Abhishek Lodha transferred 18 percent stake in the company to a charitable trust print eco news
आता लोढादेखील टाटांच्या दानकर्माच्या वाटेवर; धर्मादाय न्यासाला कंपनीतील १८ टक्के हिस्सा हस्तांतरित
NCP Clock
NCP Clock Symbol : ऐन निवडणुकीत सर्वोच्च न्यायालयाकडून अजित पवारांना आदेश; पक्षचिन्हाबाबत दिला ३६ तासांचा अल्टिमेटम!
pick up tempo fell in creek while being loaded into boat in Raigad
Video : रायगडमध्ये बोटीत चढवतांना पिकअप टेम्पो खाडीत पडला… घटना सीसीटीव्हीत कैद
rare ornate flying snake found in Sahyadri
सावंतवाडी: सह्याद्रीच्या पट्ट्यात घोटगेवाडी येथे दुर्मिळ उडता सोनसर्प आढळला
What Rahul Gandhi Said?
Rahul Gandhi : “महाराष्ट्रात सरकार आल्यानंतर महिलांना प्रति महिना ३ हजार रुपये आणि बस प्रवास मोफत”, राहुल गांधींची गॅरंटी
CJI Chandrachud
CJI Chandrachud : “सरकारविरोधात निकाल देणं म्हणजे…”, न्यायव्यवस्थेच्या स्वातंत्र्याविषयी सरन्यायाधीशांचं परखड मत

याबाबत जीएसटी पुणे विभागाच्या कार्यालयातील अधिकारी ऋषी प्रकाश (वय ३९) यांनी कोरेगाव पार्क पोलीस ठाण्यात फिर्याद दिली आहे. याप्रकरणी अश्रफभाई इब्राहिमभाई कालवाडिया (वय ५०, रा. अल्टीमेट रान्डेर रोड, सूरत, गुजरात), नितीन भागोजी बर्गे (रा. ओम साई गणेश सोसायटी, कामराजनगर, घाटकोपर, मुंबई), फैजल अब्दुल गफार मेवावाला (रा. बुर्ज अश्रफी, कांबेकर स्ट्रीट, मुंबई), निजामुद्दीन मोहम्मद सईद खान (रा. मराठी हायस्कूलच्यामागे, दिवा रस्ता, भिवंडी), अमित तेजबहाद्दुर सिंग (रा. सेंच्युरी रेयॉन कॉलनी, मुरबाद रोड, उल्हासनगर, मुंबई), राहुल बटुकभैय्या बरैय्या, कौशिक भूपतभाई मकवाना, जितेंद्र मुकेशभाई गोहेल यांच्यासह साथीदारांविरुद्ध गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

आणखी वाचा-पिंपरी महापालिकेतील तत्कालीन लेखाधिकारी किशोर शिंगेसह पत्नीवर गुन्हा

प्रकाश जीएसटी कार्यालयातील तपास पथकात नियुक्तीस आहेत. ऑक्टोबर २०२३ मध्ये पठाण एंटरप्रायजेस खात्याची ऑनलाइन तपासणी करण्यात आली. तेव्हा पठाण एंटरप्रायजेसकडून कोणत्याही प्रकारची माल खरेदी आणि विक्री होत नसून, केवळ देयके तयार करण्यात आल्याची बाब चौकशीत उघड झाली. त्यानंतर जीएसटी पथकाने हडपसर भागातील शेवाळवाडी परिसरातील पठाण एंटरप्रायजेसचा शोध घेतला. तेव्हा जीएसटी नोंदणीसाठी दिलेला पत्ता बनावट असल्याचे आढळून आले. संबंधित कंपनी, आस्थापना पठाण शब्बीर खान अन्वर खान याच्या नावावर असल्याचे निदर्शास आले. खान गुजरातमधील भावनगर परिसरात वास्तव्यास असल्याची माहिती मिळाली. त्यानंतर तपास पथक भावनगर परिसरात पोहोचले. तेव्हा पठाण रिक्षाचालक असल्याचे उघडकीस आले. पठाण एंटरप्रायजेसबाबत काहीही माहिती नसल्याचे त्याने सांगितले.

त्यानंतर तपास पथकाने ऑनलाइन तपासणी केली. विश्लेषणात एकाच मोबाइल क्रमांक, ईमेल पत्त्यावर जीएसटी नोंदणीकृत असलेल्या कंपनी, तसेच आस्थापना आढळून आल्या. बँके खात्याचा शोध घेतला. तेव्हा खातेधारक जित कुकडीया सुरक्षारक्षक असल्याची माहिती मिळाली. संबंधित खाते कुकडिया याने त्याच्या ओळखीतील आरोपी कौशिक मकवाना आणि जितेंद्र गोहेल यांच्यासाठी उघडल्याची माहिती मिळाली.

आणखी वाचा- पिंपरी विधानसभा : अखेर ठरलं, अजित पवार गटाचे अण्णा बनसोडे विरुद्ध शरद पवार गटाच्या शिलवंत-धर यांच्यात लढत

पुणे, मुंबई, राजकोट, भावनगरमध्ये कारवाई

जीएसटीच्या तपास पथकाने पुणे, मुंबई, तसेच गुजरातमधील राजकोट, भावनगर परिसरात कारवाई केली. पठाण एंटरप्रायजेस आणि इतर बनावट नावाने अश्रफभाई कालावाडिया चालवित असल्याची माहिती तपासात मिळाली. पथकाने मीरा भाईंदर परिसरातील एका लॉजमधून कालावाडिया ताब्यात घेतले. त्याच्याकडून २१ मोबाइल संच, दोन लॅपटाॅप, ११ सीमकार्ड, डेबिट कार्ड, धनादेश पुस्तिका, वेगवेगळ्या कंपनीच्या नावे रबरी शिक्के जप्त करण्यात आले. कालवाडियाला अटक करुन पुण्यातील शिवाजीनगर न्यायालायत हजर करण्यात आले. न्यायालायने त्याला १४ दिवस न्यायालयीन कोठडीत ठेवण्याचे आदेश दिले. कोरेगाव पार्क ठाण्याच्या वरिष्ठ पोलीस निरीक्षक रुणाल मुल्ला तपास करत आहेत.

आणखी वाचा-पोलीस ठाण्यापासून हाकेच्या अंतरावर असलेल्या जुगार अड्ड्यावर छापा, ६० जण ताब्यात; एक लाखांची रोकड जप्त

कर चुकविण्यासाठी २४६ बनावट कंपन्या

जीएसटी कर चुकवेगिरीसाठी आरोपी कालावाडियाने साथीदार नितीन बर्गे, फैजल मेवावाला, अमित सिंग, जितेंद्र गोहेल, कौशिक मकवाना, राहुल बरैय्या आणि साथीदारांनी कट रचला. जीएसटी कर चुकविण्यासाठी त्यांनी बनावट नावाने २४६ कंपन्या स्थापन केल्या. ज्यांना कर चुकवायाचा आहे. अशा व्यावसायिकांकडून पैसे घेऊन आरोपींनी बनावट कागदपत्रांद्वारे कर चुकवेगिरी केल्याचे तपासात उघडकीस आले आहे. सप्टेंबर २०१८ पासून मार्च २०२४ पर्यंत आरोपींनी शासनाची पाच ते आठ हजार कोटी रुपयांचा कर चुकविल्याचे जीएसटी कार्यालयाकडून देण्यात आलेल्या फिर्यादीत नमूद करण्यात आले आहे.

Story img Loader