पुणे : महापालिकेच्या विविध विभागातील पंचेचाळीस वर्षांवरील कंत्राटी सुरक्षा रक्षकांना कामावरून काढून टाकण्यात येऊ नये, असे आदेश पालकमंत्री चंद्रकांत पाटील यांनी महापालिका प्रशासनाला दिले आहेत. त्यामुळे कंत्राटी सुरक्षा रक्षकांना दिलासा मिळाला असून कंत्राटी सुरक्षारक्षकांच्या उपोषणालाही यश मिळाले आहे.

महापालिकेच्या विविध विभागांत कार्यरत असलेल्या ३०० कंत्राटी सुरक्षा रक्षकांना वयाचे कारण पुढे करून कामावरून काढून टाकण्यात आले आहे. त्याचे तीव्र पडसाद शहरात उमटले होते. महापालिकेच्या या निर्णयाला राष्ट्रवादी काँग्रेसने विरोध दर्शवित आंदोलन केले होते. तसेच आमदार चेतन तुपे यांनी हा मुद्दा विधिमंडळाच्या अधिवेशनातही उपस्थित केला होता. तर राष्ट्रीय मजदूर संघाचे अध्यक्ष सुनील शिंदे यांच्या नेतृत्वाखाली कंत्राटी सुरक्षा रक्षकांकडून उपोषण सुरू करण्यात आले होते. त्याची दखल घेत पालकमंत्री चंद्रकांत पाटील यांनी महापालिका प्रशासनाला कंत्राटी सुरक्षा रक्षकांना कामावरून काढून टाकू नये, असे आदेश दिले आहेत.

Trinamool Congress MPs protesting in front of the Central Election Commission headquarters protested at the police station
तृणमूलचे ‘राजकीय नाटय़’; केंद्रीय तपास यंत्रणांविरोधात पोलीस ठाण्यात २४ तास ठिय्या आंदोलन
If you want to talk negatively leave gathering says Minister Chandrakant Patil
नकारात्मक बोलायचे असेल तर मेळाव्यातून बाहेर जा; मंत्री चंद्रकांत पाटील यांची महायुतीच्या पदाधिकाऱ्यांना तंबी
Slum cleaning contract
झोपडपट्टी स्वच्छता कंत्राट : चौथ्यांदा मुदतवाढीची नामुष्की, १५ एप्रिलला न्यायालयात सुनावणी
Sales of e-vehicles pune
गडकरींनी वारंवार सांगूनही लोकांनी फिरवली पाठ! ई-वाहनांच्या विक्रीला गती मिळेना

हेही वाचा – ‘टेमघर’ पुन्हा रिकामे, दुरुस्तीच्या कामांसाठी पाणी सोडण्यास सुरुवात

कंत्राटी सुरक्षा रक्षकांना कामावर घ्यावे, यासाठी राष्ट्रीय मजदूर संघाचे अध्यक्ष सुनील शिंदे यांच्या नेतृत्वाखाली सातत्याने पाठपुरावा चालू होता. प्रशासन त्यासंदर्भात कुठलीही भूमिका घेत नव्हते. त्यामुळे कंत्राटी कामगारांकडून आमरण उपोषण सुरू करण्यात आले होते. त्यानंतर उपोषणकर्त्यांनी पालकमंत्री चंद्रकांत पाटील यांची भेट घेतली. आयुक्त विक्रम कुमार, अतिरिक्त आयुक्त रविंद्र बिनवडे, डाॅ. कुणाल खेमनार या वेळी उपस्थित होते. त्या वेळी कंत्राटी सुरक्षा रक्षकांना कामावरून काढून न टाकण्याचे आदेश पालकमंत्री चंद्रकांत पाटील यांनी दिले.