“महाराष्ट्राचा मुख्यमंत्री जो असतो, हा देशातला सगळ्यात मोठा नेता म्हणून त्याला मान्यता असते. गुजरातचा मुख्यमंत्री पंतप्रधान होऊ शकतो मग महाराष्ट्राचा का नाही? हे तर छत्रपती शिवाजी महाराजांचं राज्य आहे. डॉ.बाबासाहेब आंबेडकर, महात्मा फुले अशी महान परंपरा असलेल्या राज्याचं नेतृत्व जो करतो, तो या देशाचाच नेता असतो हे लक्षात घ्या. ” असं शिवसेना नेते संजय राऊत म्हणाले आहेत. तसेच, “तुम्ही कितीही आपटली तरी ठाकरे सरकारचा केसही वाकडा करू शकणार नाहीत. असा टोला देखील राऊत यांनी विरोधकांना लगावला.” आज (रविवार) पुण्यात पदाधिकारी मेळाव्यात ते बोलत होते.

यावेळी संजय राऊत म्हणाले, “मला कुणीतरी विचारलं मुख्यमंत्री उद्धव ठाकरे दिल्लीला कशाला गेले? मी म्हणालो दिल्ली पाहायला गेले. भविष्यात तिथे जाऊन आम्हाला राज्य करायचं आहे आणि आम्ही जेव्हा म्हणतो राज्य करायचं आहे, तेव्हा ते आमचं राज्य दिल्लीत येणार आहे, हे लक्षात घ्या. आता दिल्लीत राज्य येणार, महाराष्ट्रात येणार पण पुण्यात कधी येणार ते सांगा? या पुण्यात छत्रपती शिवाजी महाराजांनी सोन्याचा नांगर लावून ही जमीन नांगरली. मोगलशाहीविरोधात या पुण्यात देखील आपलं राज्य येणं ही आपली, काळाची गरज आहे.”

“२०२४ मध्येही उद्धव ठाकरेचं मुख्यमंत्री होणार”; संजय राऊतांचं विधान!

तसेच, “मुख्यमंत्री आज सकाळी दिल्लीत होते, लोक म्हणतात दिल्लीत कशासाठी गेले मुख्यमंत्री? प्रत्येकाच्या मनात शंका येत होत्या, अनेकजण पाण्यता देव ठेवून बसले होते. काय होतंय, काय नाही होतंय.. याचा विचार सुरू होता. पण मुख्यमंत्री परत मुंबईत आले आहेत. अमित शाहांना देखील भेटले. त्यांची कोणतीही व्यक्तिगत चर्चा झालेली नाही. ज्या शासकीय कामासाठी ते गेले होते, तेवढच काम करून ते राज्यात मुंबईत परतले. हे सरकार अजून तीन वर्षे चालेल, मुख्यमंत्रपदी उद्धव ठाकरेच असतील आणि २०२४ नंतर देखील तेच असतील.” असा दावा देखील संजय राऊत यांनी जाहीरपणे यावेळी केला.

संजय राऊतांचा चंद्रकांत पाटलांना टोला; म्हणाले, “त्यांच्यावरील प्रेमाखातर मी सव्वा रुपया…”

याचबरोबर,“आपण पुण्यात आलेलो आहोत, पुण्यात उत्साह नेहमी दांडगा असतो. त्यात अजिबात काही कमतरता नसते. मुंबईने धडे घ्यावे, ठाणेकरांनी धडे घ्यावेत. त्यांना घोषणा द्यायला सांगावं लागत नाही, गर्दी करायलाही सांगावं लागत नाही. पण महापालिकेत मात्र दहा नगरसेवक पण आता हे दहा राहणार नाहीत. दस का दम…आदित्य शिरोडकर व सचिन आहीर उद्धव ठाकरे यांनी आपली नियुक्ती यासाठीच केली आहे, की आता दहा वर थांबायचं नाही. पुढील मनपा निवडणुकीनंतर जे मी पिंपरी-चिंचवडमध्ये सांगितलं. आपल्याकडे असा एक आकडा पाहिजे, आता आपण एक असा आकडा लावायचा की आपल्या शिवाय इथं कोणाचा महापौर होता कामानये, इथं आमचाच होणार.” असं देखील संजय राऊत यांनी बोलून दाखवलं.