पुणे : विषारी दारू प्रकरणात हडपसर पोलीस ठाण्याचे वरिष्ठ पोलीस निरीक्षकासह तिघांना निलंबित करण्याचे आदेश पोलीस आयुक्त अमितेशकुमार यांनी दिले.

विषारी दारू प्रकरणात हडपसर परिसरातील चौघांचा मृत्यू झाला. या घटनेनंतर समाज माध्यमात नागरिकांनी तीव्र प्रतिक्रिया नोंदविल्या, तसेच अवैध धंद्यांना पोलिसांनी पाठीशी घातले, असा आरोपही करण्यात आला.

या घटनेंची गंभीर दखल घेऊन पोलीस आयुक्त अमितेशकुमार यांनी शुक्रवारी रात्री हडपसर पोलीस ठाण्याचे वरिष्ठ पोलीस निरीक्षक संजय मोगले, सहायक पोलीस निरीक्षक हसीना शिकलगार, तसेच उपनिरीक्षक हसन मुलाणी यांना निलंबित करण्याचे आदेश दिले.