पुणे : कर्करोगावरील उपचार आणि त्या दरम्यान सहन करावा लागणारा मानसिक आणि शारीरिक त्रास हा कोणत्याही कर्करुग्णाच्या आयुष्यातील एक अत्यंत अवघड टप्पा असतो. केमोथेरपी उपचारांदरम्यान केस जाणे हा त्याच खडतर प्रवासाचा एक भाग. कर्करुग्णांच्या या दुखण्यावर फुंकर घालण्यासाठी ‘हेअर फॉर होप इंडिया’ तर्फे उद्या (रविवार, २४ जुलै) ‘कट अ थॉन’ मोहिमेचे आयोजन केले आहे. देशभर २५ शहरांमध्ये केस दान करणे शक्य होणार आहे.

या बातमीसह सर्व प्रीमियम कंटेंट वाचण्यासाठी साइन-इन करा

केमोथेरपीचे उपचार घेणाऱ्या कर्करुग्णांना पूर्वनोंदणी करून प्रत्येकी पाच पोनीटेल केस मोफत उपलब्ध करून देणार असल्याचे हेअर फॉर होप इंडियाकडून स्पष्ट करण्यात आले आहे. स्वत: कर्करोगातून बऱ्या झालेल्या प्रेमी मॅथ्यू यांच्या पुढाकाराने हेअर फॉर होप इंडियाची सुरुवात झाली. केमोथेरपी सुरू असलेल्या कर्करुग्णांनी आधार कार्ड आणि वैद्यकीय अहवालाची प्रत दाखवून मोफत केसांसाठी नाव नोंदणी करावी असे आवाहन हेअर फॉर होप इंडियातर्फे करण्यात आले आहे.

हेअर फॉर होप इंडियाचे प्रादेशिक समन्वयक लेंडिल सनी म्हणाले, केमोथेरपी उपचारांदरम्यान केस जाणे ही गोष्ट कर्करुग्णांना मानसिकरीत्या खचवणारी असते. त्यावर उपाय म्हणून केस दान करण्याची चळवळ सुरू झाली. हेअर फॉर होप इंडियाचे अनेक स्वयंसेवक नियमित केस वाढवतात आणि कर्करुग्णांसाठी दान करतात. उद्या होणारा कट अ थॉन उपक्रम देशात २५ ठिकाणी होत आहे. ऑनलाइनही त्याचे आयोजन करण्यात आले आहे. १२ इंच केस दान करण्याची तयारी असलेले सर्व नागरिक या उपक्रमात सहभागी होऊ शकतात, असेही सनी यांनी स्पष्ट केले आहे. http://www.protectyourmom.asia या संकेतस्थळावर आपल्या नजिकच्या केसदान केंद्राची माहिती शनिवारी रात्रीपर्यंत प्रसिद्ध करण्यात येणार आहे.

मोफत केसांसाठी इथे नाव नोंदवा केमोथेरपी उपचार सुरू असलेल्या रुग्णांनी आधार कार्ड आणि वैद्यकीय अहवालाची प्रत यासह ९१ ७७३६० ३८२८७ या क्रमांकावर संदेश पाठवावा. त्यांना पाच पोनीटेलपर्यंत केस मोफत दिले जातील. या केसांपासून आपल्या विगकर्त्याकडून विग तयार करून घ्यावा किंवा हेअर फॉर होप इंडियातर्फे त्यांना विगकर्त्याशी जोडून दिले जाईल, असे आवाहन करण्यात आले आहे.

Pune News (पुणे न्यूज), Maharashtra News, Marathi News (मराठीतील बातम्या) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.
Web Title: Hair for hope india campaign to donate hair for cancer patients pune print news zws
First published on: 23-07-2022 at 17:05 IST