मालेगावात रविवारी ( २६ मार्च ) शिवसेना ( ठाकरे गट ) पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांची सभा झाली. या सभेत उद्धव ठाकरे यांनी भाजपा आणि शिंदे गटाचा समाचार घेतला. भाजपा हा भ्रष्टाचारी पक्ष आहे. त्यांच्याकडे इतर पक्षातील नेते गेले की गुजरातच्या निरमा पावडरने धुतले जातात. हर्षवर्धन पाटील यांनी सांगितलं होतं, भाजपात आल्यानंतर चांगली झोप लागती, असं म्हणत उद्धव ठाकरेंनी हल्लाबोल केला होता. याला आता हर्षवर्धन पाटील यांनी प्रत्युत्तर दिलं आहे.

“उद्धव ठाकरेंनी बऱ्याच वेळा माझ्या नावाचा संदर्भ दिला आहे. त्यांना लिहून दिलेली स्क्रीप्ट अपुऱ्या माहितीवर असेल. मी केलेलं वक्तव्य वेगळ्या संदर्भाबाबत होतं. माझ्यावर कोणतीही चौकशा सुरू असून, आरोप लागलेत असं काहीही नाही,” असं स्पष्टीकरण हर्षवर्धन पाटील यांनी ‘टीव्ही ९ मराठी’शी बोलताना दिलं.

Uddhav Thackeray, Mahayuti, campaign,
उद्धव ठाकरे यांना आयतेच कोलीत
wildlife lovers, Tigers, forest, cages,
‘वाघ जंगलात नको, पिंजऱ्यात हवेत का?’ वन्यजीवप्रेमींचा सवाल; प्रकरण काय? जाणून घ्या…
Mentally retarded girl pregnant from sexual abuse crime was solved with the efforts of Bharosa Cell
लैंगिक अत्याचारातून मतीमंद मुलगी गर्भवती; भरोसा सेलच्या प्रयत्नाने उलगडला गुन्हा
gaanewali program at tarun tejankit
सक्षम भविष्याचे स्वप्न सत्यात उतरवणाऱ्या प्रज्ञेचा सन्मान

हेही वाचा : “लोकांना सांगतो, पटलं तर मत द्या, नाहीतर…”, नितीन गडकरींचं नागपुरात विधान

“भाजपात जाऊन ४ वर्षे झाली आहेत. माझ्यावर प्रचंड अन्याय काँग्रेस-राष्ट्रवादीच्या माध्यमातून झाला. आम्ही प्रामाणिकपणे काम करून सुद्धा, स्वाभिमान दुखावला गेला. एकदा नाही ४ वेळा अन्याय झाला. आमच्या कार्यकर्त्यांनी विचार केला, इथे प्रामाणिकपणाला थारा नाही. शब्द दिल्यावर कोणी पाळत नाही. भाजपा राष्ट्रीय पक्ष आहे. त्यानंतर देवेंद्र फडणवीस यांच्याबरोबर चर्चा झाली. म्हणून आमचा स्वाभिमान टिकवण्यासाठी आणि या भागातील कामे होण्यासाठी भाजपात प्रवेश केला,” असं हर्षवर्धन पाटील यांनी सांगितलं.

हेही वाचा : “…म्हणून उद्धव ठाकरेंनी मुख्यमंत्रीपदाचा राजीनामा दिला”, सुहास कांदेंचा मोठा गौप्यस्फोट

“विरोधी पक्षाच्या लक्षात आलं, महाराष्ट्रातील सत्ता गेली आहे. पुन्हा सत्ता येईल, याची खात्री राहिली नाही. म्हणून वारंवार अशाप्रकारे आरोप करत भाजपाला बदनाम करायचं. भ्रष्टाचार कोणी केला हे महाराष्ट्र आणि देशातील जनता ओळखते. भ्रष्टाचाऱ्याच्या मागची सूत्र कोण आहेत, हे सर्वांना माहिती आहे. त्यामुळे हा बिनबुडाचा आरोप आहे. वैफल्यग्रस्त झाल्याने अशाप्रकारची वक्तव्य होत आहेत,” असं टीकास्र हर्षवर्धन पाटील यांनी सोडलं आहे.