पुणे : सिंहगड रस्त्यावरील किरकटवाडी भागात एका उपाहारगृहात तोडफोड करून दहशत माजविणाऱ्या गुंडांची हवेली पोलिसांनी धिंड काढली.

सराईत गुंड वैभव इक्कर आणि साथीदार चेतन चोरघे (दोघे रा. कोल्हेवाडी, सिंहगड रस्ता) यांनी दोन दिवसांपूर्वी सिंहगड रस्त्यावरील एका उपाहारगृहात तोडफोड केली होती. या घटनेची माहिती मिळाल्यानंतर हवेली पोलीस ठाण्यातील पोलीस कर्मचाऱ्यांना दोघांनी शिवीगाळ केली होती. आरोपी वैभव इक्कर सराईत असून, त्याच्याविरुद्ध गंभीर गुन्हे दाखल झाले आहेत. हाॅटेलमध्ये तोडफोड करून दहशत माजविल्या प्रकरणी इक्कर आणि साथीदार चोरघे यांच्याविरुद्ध हवेली पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. त्यानंतर इक्कर आणि साथीदारांची दहशत मोडीत काढण्यासाठी हवेली पोलीस ठाण्यातील पोलीस अधिकारी अनमोल मित्तल यांनी कारवाईच्या सूचना दिल्या.

kidnap of uncle of MLA Yogesh Tilekar, Yogesh Tilekar uncle, Yogesh Tilekar latest news,
आमदार योगेश टिळेकर यांच्या मामाचे अपहरण, पोलिसांकडून अपहरणकर्त्यांचा शोध
Rohit Patil
Rohit Patil : “अमृताहुनी गोड…”; विधानसभेत रोहित पाटलांचं…
attack on police Nagpur, Nagpur, police Panchnama Nagpur,
हे काय चाललेय नागपुरात? पंचनामा करायला गेलेल्या पोलिसावरच हल्ला….
Police seize nine kilos of ganja in Kala Khadak and Nigdi three arrested
काळा खडक आणि निगडीमध्ये पोलिसांनी नऊ किलो गांजा केला जप्त, तिघांना बेड्या
Stock of village hand bombs seized in Thane news
ठाण्यात गावठी हात बाॅम्बचा साठा जप्त
Ramdas Athawale on Eknath Shinde
Eknath Shinde : मुख्यमंत्रीपदाबाबत भाजपा हायकमांडने एकनाथ शिंदेंना काय सांगितले? रामदास आठवले म्हणाले…
CIDs behaviour in Badlapur case is suspicious
बदलापूर प्रकरणी सीआयडीचे वर्तन संशयास्पद
Eknath Shinde Maharashtra Government Formation
Eknath Shinde : “बोटीने प्रवास करून भेटायला आलो, पण…”, प्रकृती बिघडल्याने एकनाथ शिंदेंनी कार्यकर्त्यांची भेट नाकारली!

हेही वाचा – अजित पवारांच्या शपथविधीचा उल्लेख करत राज ठाकरेंचा हल्लाबोल; म्हणाले, “शरद पवारांचे…”

हेही वाचा – पिंपरी : दि सेवा विकास बँकेच्या तत्कालीन संचालकांची पुन्हा चौकशी; सर्वोच्च न्यायालयाचे आदेश

इक्कर आणि चोरघे यांना घेऊन पोलिसांच्या पथकाने सिंहगड रस्त्यावरील किरकटवाडी, कोल्हेवाडी भागातून धिंड काढली. यापूर्वी किरकटवाडी परिसरात गुंडांनी दहशत माजविल्याची घटना घडली होती. पोलिसांनी कारवाई केल्याने गुंडांना जरब बसेल. पोलिसांनी केलेली कारवाई योग्य आहे, असे नागरिकांनी सांगितले. पोलिसांनी केलेल्या कारवाईचे या भागातील नागरिकांनी कौतुक केले आहे.

Story img Loader