पुणे : प्रेमाला वय नसते असे म्हणतात तेच खरे. कारण अशीच एक घटना पुण्याच्या आळंदीतील चऱ्होली खुर्द येथे घडली आहे. ५८ वर्षीय व्यक्तीने ४५ वर्षीय प्रेयसीसोबत पळून जाण्यासाठी आपल्या मित्राची निर्घृण हत्या करून स्वतः च्या मृत्यूचा बनाव रचला आणि प्रेयसीसोबत पलायन केले. सुभाष असे ५८ वर्षीय आरोपीचे नाव आहे तर रवींद्र असे निर्घृण हत्या झालेल्या व्यक्तीचे नाव आहे. स्वतः च्या मृत्यूचा बनाव रचून त्यांनी कुटुंबाला चकवा दिला मात्र ते पोलिसांना चकवा देऊ शकले नाहीत. तर कुटुंबातील व्यक्तींनी आरोपी सुभाषचे अपघाती निधन झाले असे समजून दशक्रिया विधी देखील केला. आरोपी सुभाष प्रेयसीला घेऊन जेजुरीत गेला होता. तिथं ते काही दिवस राहिला. सुभाषने मित्राची हत्या केल्याची माहिती प्रेयसीला दिली. यामुळे प्रेयसी घाबरून तिच्या गावी परत आली अशी माहिती पोलिस सूत्रांनी दिली आहे. 

पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार,५८ वर्षीय आरोपी सुभाष आणि हत्या झालेला रवींद्र हे दोघे मित्र होते. रवींद्र हा बदली चालक म्हणून काम करायचा. अनेकदा तो तीन- चार दिवस घरी परतत नव्हता. दरम्यान प्रेयसीसोबत पळून जाण्याचा प्लॅन आरोपी सुभाषने आखला. मग मित्र रवींद्रला सोबत घेऊन तो शेतात गेला. तिथे त्याची कोयत्याने निर्घृण हत्या केली. मृतदेहाला स्वतः चे कपडे घातले आणि ट्रॅक्टरच्या रोटरमध्ये मृतदेह घालून तो अपघात असल्याचा बनाव संतोषने रचला. त्यात तो काहीसा यशस्वी झाला. आळंदी पोलिसांना याबाबत संशय असल्याने ईडी दाखल करून तपास सुरू ठेवला. 

A chance for historic success for Indian chess players sport news
भारतीय बुद्धिबळपटूंना ऐतिहासिक यशाची संधी!
Ram Navami 2024: Mughal version of Ramayana
Ram Navami 2024: ‘या’ मुघल सम्राटाच्या आईला प्रिय होते रामायण? कोण होता हा सम्राट?
Nagpur MIDC police arrested the youth who molested the girl crime news
विवाहितेच्या अंगावर चिठ्ठी फेकली, पुढे झाले असे की…
mukhtar ansari umar ansari
“कट रचून विषप्रयोग केला”, मुख्तार अन्सारीच्या मुलाचे गंभीर आरोप; म्हणाला “तीन दिवसांपूर्वी त्यांनी…”

हेही वाचा: पुणे हादरलं! १५ वर्षीय अल्पवयीन मुलीवर सामूहिक बलात्कार

दरम्यान, घटनेनंतर संतोष आपल्या प्रेयसीला घेऊन जेजुरीला पसार झाला. कुटुंबाने मात्र आरोपी संतोषचा अपघातात मृत्यू झाला अस समजून दशक्रिया विधी केला. जेजुरीत आरोपी संतोष ४५ वर्षीय प्रेयसीसोबत राहात होता. मी माझ्या हत्येचा बनाव रचला असून मित्राची हत्या केली आहे असे संतोषने प्रेयसीला सांगितले. यामुळे घाबरलेल्या प्रेयसीने घरी जाण्याचा तगादा लावला. संतोषने प्रेयसीला तिच्या गावी सोडले सोबतचे पैसे देखील संपले असल्याने त्याची अवस्था बिकट झाली होती. तो त्याच्या चुलत बहिणीकडे पायी जात असताना चोर समजून काही नागरिकांनी त्याला चोप दिला. त्याने स्वतःच नाव संतोष असे सांगितले.

हेही वाचा: पुणे: शहरात तीन वर्षांत आगीच्या ५४६ घटना

मग तिथे त्या गावात राहणारी त्याची चुलत बहीण आली. आधीच आरोपी संतोषचा दशक्रिया विधी झाला असल्याने तो इथे कसा येईल या आशयाने आलेली चुलत बहीण संतोषला बघताच बेशुद्ध पडली. तिने तिला तातडीने आळंदी पोलिसांना बोलावले आणि तिथेच संतोषच्या मृत्यूच्या बनावाचं बिंग फुटले . या प्रकरणी आरोपी संतोषला बेड्या ठोकण्यात आल्या आहेत. अधिक तपास आळंदीचे वरिष्ठ पोलिस निरीक्षक सुनील गोडसे हे करत आहेत.