scorecardresearch

हृदयद्रावक : लोणावळा इथे वाढदिवस साजरा करण्यासाठी आलेल्या दोन वर्षीय चिमुकल्याचा स्विमिंग पुलात बुडून मृत्यू

लोणावळ्यात दोन वर्षाच्या मुलाचा स्विमिंग पुलाच्या पाण्यात बुडून मृत्यू झाल्याची हृदयद्रावक घटना घडली आहे.

drwone children
लोणावळा इथे वाढदिवस साजरा करण्यासाठी आलेल्या दोन वर्षीय चिमुकल्याचा स्विमिंग पुलात बुडून मृत्यू

पुणे : लोणावळ्यात दोन वर्षाच्या मुलाचा स्विमिंग पुलाच्या पाण्यात बुडून मृत्यू झाल्याची हृदयद्रावक घटना घडली आहे. शिवबा अखिल पवार असं मृत्यू झालेल्या चिमुकल्याचे नाव आहे. ही घटना सहा दिवसांपूर्वी लोणावळ्यात घडली. या घटनेमुळं पवार कुटुंबावर दुःखाचा डोंगर कोसळला  आहे. मयत शिवबा आणि त्याच्या जुळ्या बहिणीचा दुसऱ्या दिवशी वाढदिवस होता. या घटनेचा सीसीटीव्ही समोर आला आहे.

पाहा व्हिडीओ –

पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार पवार कुटुंब जुळ्या मुलांचा वाढदिवस साजरा करण्यासाठी लोणावळ्यात तुंगार्ली इथल्या गोल्ड व्हॅलीतील पुष्पा व्हिला बंगला इथे आले होते. 13 जुलै ला संध्याकाळी सातच्या सुमारास कुटुंबीयांचे लक्ष नसतांना दोन वर्षाचा शिवबा हा स्विमिंग पुलच्या ठिकाणी आला आणि पाण्यात पडला. शिवबा दिसत नसल्याने त्याचा शोध घेण्यास कुटुंबीयांनी सुरुवात केली असता शिवबा पाण्यात असल्याचे आढळून आले. तोपर्यंत शिवबाचा मृत्यू झाला होता. या प्रकरणी अद्याप कोणावरही गुन्हा दाखल करण्यात आलेला नसल्याचे लोणावळा पोलिसांनी सांगितले.

मराठीतील सर्व पुणे ( Pune ) बातम्या वाचा. मराठी ताज्या बातम्या (Latest Marathi News) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.

First published on: 19-07-2022 at 14:49 IST
ताज्या बातम्या