आणखी आठवडाभर तापमानवाढ कायम

पावलस मुगुटमल

Nashik heat, Temperature Hits New High, 40 Degrees Celsius, nobody on manmad street market, summer, summer news, summer in nashik, heatwave in nashik, heat wave in manmad, manmad news, nashik news,
नाशिक : उंचावणाऱ्या तापमानाने आरोग्याच्या समस्यांमध्ये वाढ, मनमाडमधील रस्त्यांवर असलेला शुकशुकाट
In Vidarbha thousands of hectares of orchards and crops were destroyed due to unseasonal rains
विदर्भात हजारो हेक्टरवरील फळबागा, पिकांची नासाडी; तिसऱ्या दिवशीही अवकाळीचे तांडव
Solapur recorded the highest degree Celsius maximum temperature in the state
दोन दिवस होरपळीचे! विदर्भात उष्णतेच्या लाटेचा इशारा, रात्रीच्या उकाडय़ातही वाढीचा अंदाज
Highest temperature recorded in Akola city
अकोल्यात उन्हाच्या झळा, तापमान ४२.८ अंशांवर; विदर्भात तापमानाच्या पाऱ्यात वेगाने वाढ

पुणे : पुणे शहर आणि परिसरात थंडीच्या हंगामात ऐन डिसेंबरमध्ये उकाडा निर्माण झाला आहे. रात्रीच्या किमान तापमानात सरासरीच्या तुलनेत मोठी वाढ झाली असल्याने थंडी पूर्णपणे गायब झाली आहे. त्याचप्रमाणे दिवसाचे कमाल तापमानही वाढल्याने उन्हाचा चटकाही वाढला आहे. अशा स्थितीत थंडीच्या हंगामात गरम कपड्यांऐवजी पुणेकरांना पंखे, कुलर आणि वातानुकूलित यंत्रणेचा आधार घ्यावा लागतो आहे. पुणे वेधशाळेने दिलेल्या अंदाजानुसार आणखी आठवडाभर तापमानातील वाढ कायम राहण्याची शक्यता आहे.

नोव्हेंबर महिन्यातही तापमानात मोठ्या प्रमाणातवर चढ-उतार झाले. मात्र, नोव्हेंबरच्या पंधरवड्यानंतर शहरात थंडीचा कडाका अनुभवण्यास मिळाला. २० ते २२ नोव्हेंबरच्या दरम्यान पुण्यात ८ ते ९ अंश सेल्सिअसपर्यंत तापमान खाली येऊन या हंगामातील आणि गेल्या पाच वर्षांतील नीचांकी तापमानाची नोंद झाली होती. याच आठवड्यात पुणेकरांना थंडीची अनुभूती मिळाली. मात्र, त्यानंतर बंगालच्या उपसागरामध्ये आणि अरबी समुद्रातही सातत्याने कमी दाबाचे क्षेत्र निर्माण झाले. त्यामुळे समुद्रातून बाष्प येऊन दक्षिणेकडे पाऊस झाला. त्याचा परिणाम म्हणून महाराष्ट्रात आणि पुणे शहरातही सर्वच भागातील तापमानात सातत्याने वाढ होऊ लागली. गेल्या दोन ते तीन दिवसांपासून पुन्हा तापमानात झपाट्याने वाढ सुरू झाली आहे.

नोव्हेंबरच्या मध्यावर कडाक्याच्या थंडीमुळे तापमान सरासरीच्या तुलनेत ६ ते ७ अंशांनी कमी झाले होते. दिवसाचे तापमानही ३० अंशांखाली आले होते. त्यामुळे रात्री थंडी आणि दिवसाही गारव्याचा अनुभव येत होता. मात्र, सध्या स्थिती एकदम पालटली आहे. पुण्यात सोमवारी रात्रीच्या किमान तापमानात सरासरीच्या तुलनेत तब्बल ५.९ अंशांनी वाढ होऊन ते १८.५ अंशांवर पोहोचले होते. त्यामुळे रात्री थंडी गायब झाली होती. दिवसाच्या कमाल तापमानातही सरासरीच्या तुलनेत २.५ अंशांनी वाढ झाली. त्यामुळे ३२.२ अंश कमाल तापमानाची नोंद झाली. त्यामुळे दिवसा उन्हाचा चटका जाणवत होता.

राज्यातही उकाड्याची स्थिती

बंगालच्या उपसागरामध्ये सध्या कमी दाबाचे क्षेत्र निर्माण झाले आहे. त्याची तीव्रता वाढत जाण्याची शक्यता आहे. कमी दाबाचे हे क्षेत्र उत्तर-पश्चिम दिशेने पुढे सरकणार आहे. त्याचा परिणाम म्हणून सध्या तमिळनाडू, आंध्र प्रदेश आणि लगतच्या भागामध्ये पाऊस सुरू झाला आहे. पुढील दोन-तीन दिवसांत या भागांत जोरदार पावसाची शक्यता आहे. या सर्वांचा परिणाम सध्या महाराष्ट्रावर होत असून, तापमानात वाढ होत आहे. सध्या महाराष्ट्रातील सर्वच भागांतील रात्रीचे आणि दिवसाच्या तापमानात सरासरीच्या तुलनेत मोठी वाढ झाली आहे. त्यामुळे थंडी गायब झाली आहे. मध्य महाराष्ट्रातील किमान तापमान सरासरीच्या तुलनेत तब्बल ४ ते ९ अंशांनी वाढले आहे. मराठवाड्यात ४ ते ६, विदर्भात १ ते ३, तर कोकणात १ ते ३ अंशांनी किमान तापमान सरासरीपुढे आहे.