धरणक्षेत्रात जोरदार पाऊस

पुणेकरांसाठी यंदा पाण्याचे गंभीर संकट निर्माण झाले आहे. पुण्यात सध्या एक दिवसाआड पाणीपुरवठा केला जातो आहे.

पुणेकरांना महिनाभर पुरणारे पाणी एकाच दिवसात धरणांमध्ये जमा
पुणे शहराला पाणीपुरवठा होत असलेल्या धरणांच्या क्षेत्रामध्ये रविवारी जोरदार पाऊस झाल्याने अवघ्या एकाच दिवसांत धरणांमध्ये पुणेकरांना एक महिना पुरणाऱ्या पाण्याची भर पडली. रविवारी एक टीएमसी (अब्ज घनफूट) पाण्याची भर पडल्यामुळे धरणांतील पाणीसाठा दोनच दिवसात सुमारे दीड टीएमसीने वाढला आहे. त्यामुळे पुणेकरांना दिलासा मिळतो आहे. येत्या काळातही चांगल्या पावसाची शक्यता व्यक्त केली जात असल्याने धरणांतील पाण्याची पातळी आणखी वाढेल, अशी आशा निर्माण झाली आहे.
Untitled-4
पुणेकरांसाठी यंदा पाण्याचे गंभीर संकट निर्माण झाले आहे. पुण्यात सध्या एक दिवसाआड पाणीपुरवठा केला जातो आहे. याच दरम्यान मे महिन्यामध्ये दौंड व इंदापूरसाठी कालव्याद्वारे एक टीएमसी पाणी सोडण्यात आले. पावसाने दिलेली ओढ व धरणातून झपाटय़ाने कमी झालेल्या पाणीसाठय़ामुळे पुण्यातील पाणीकपातीत आणखी वाढ करण्याचे नियोजनही सुरू करण्यात आले आहे. मात्र, मागील दोन दिवसांपासून धरणक्षेत्रातील पावसामुळे काही प्रमाणात तरी पाणीसाठा वाढत असल्याने समाधान व्यक्त करण्यात येत आहे.
शुक्रवारी धरणांतील पाणीसाठा १.४७ टीएमसी होता. शनिवारी झालेल्या पावसामुळे त्यात ०.२६ टीएमसीची वाढ झाली. त्यानंतर शनिवारी रात्रीपासून ते रविवारी संध्याकाळपर्यंत चांगला पाऊस झाल्याने एकाच दिवशी धरणात एक टीएमसी पाण्याची वाढ झाली आहे. सध्या धरणांमध्ये २.९६ टीएमसी पाणीसाठा आहे. हा रविवार संध्याकाळपर्यंतचा आकडा असल्याने रात्रीच्या पावसाने पाणीसाठय़ात आणखी भर पडण्याची शक्यता आहे. मात्र, मागील वर्षांची तुलना करता पाण्याचा साठा खूपच कमी असल्याचे चित्र आहे. मागील वर्षी याच दिवशी धरणांमध्ये सात टीएमसीहून अधिक पाणीसाठा होता.

Loksatta Telegram लोकसत्ता आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@Loksatta) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.

मराठीतील सर्व पुणे बातम्या वाचा. मराठी ताज्या बातम्या (Latest Marathi News) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App. ताज्या बातम्या (latest News) फेसबुक , ट्विटरवरही वाचता येतील.

Web Title: Heavy rain in dam area

ताज्या बातम्या