पिंपरी : पिंपरी-चिंचवड शहरात शुक्रवारी सायंकाळी जोरदार पाऊस पडला. सायंकाळी साडेसहा ते साडेसात या तासाभरात झालेल्या पावसाने शहरातील अनेक ठिकाणी पाणी साचले. मोठी वाहतूक कोंडी झाली. भोसरीत एका मोटारीवर झाड पडले. सुदैवाने कोणतीही जिवीतहानी झाली नाही.
पिंपरी-चिंचवड शहरात गेल्या तीन दिवसांपासून सकाळी मोठ्या प्रमाणावर उकाडा जाणवतो आणि सायंकाळनंतर ढगाळ वातावरण तयार होऊन ढगांचा गडगडाट, जोरदार वाऱ्यासह पाऊस पडत आहे. शुक्रवारीही सायंकाळी जोरदार वार्यासह पाऊस कोसळला. बीआरटी मार्गात चिंचवड, आकुर्डीत पाणी साचले होते. पवळे पुलावर, निगडी, यमुनानगर, चिखली, बिजलीनगर, भूमकर चौक, ताथवडे, पुनावळेतील भुयारी मार्गासह सखल भागात मोठ्या प्रमाणात पाणी साचले होते. त्यामुळे वाहनचालकांना वाहतूक कोंडीचाही सामना करावा लागला.चिखलीतील घरकुलमध्ये पाणी शिरले. जोरदार वार्यासह झालेल्या या पावसामुळे अनेक ठिकाणी वीजपुरवठा खंडित झाला होता. जवळपास तासभराहून अधिक काळ वीजपुरवठा खंडित होता.