‘कोव्हिशिल्ड’धारक विद्यार्थ्यांना परदेशात मदत

जगातील काही देशांमध्ये अद्याप कोव्हिशिल्ड लस घेतलेल्या लाभार्थींना प्रवेशाची परवानगी नाही.

स्व-विलगीकरणाचा खर्च अदर पूनावाला यांच्या सीरम इन्स्टिट्यूटकडून

पुणे : ज्या विद्यार्थ्यांनी कोव्हिशिल्ड लस घेतली आहे आणि ते जाणार असलेल्या देशात कोव्हिशिल्ड लस घेतलेल्या नागरिकांना  स्व-विलगीकरणाची सोय स्वत: करावी लागणार असेल तर हा खर्च विद्यार्थ्यांना सहन करावा लागू नये यासाठी सीरम इन्स्टिट्यूटचे मुख्य कार्यकारी अदर पूनावाला यांनी मदतीचा हात पुढे के ला आहे.

जगातील काही देशांमध्ये अद्याप कोव्हिशिल्ड लस घेतलेल्या लाभार्थींना प्रवेशाची परवानगी नाही. अशा देशांमध्ये शिक्षणासाठी जाणाऱ्या विद्यार्थ्यांची त्यामुळे गैरसोय होणार आहे. विद्यार्थ्यांना संबंधित देशामध्ये पोहोचल्यानंतर स्व-विलगीकरण पूर्ण करावे लागणार आहे. त्यासाठीची सोय आणि आर्थिक तरतूदही विद्यार्थ्यांना स्वत:च करावी लागणार आहे. सर्वच विद्यार्थ्यांना हे शक्य होईल असे नाही. हे लक्षात घेऊन अदर पूनावाला यांनी आर्थिक मदतीची तयारी दर्शवली आहे.

तरतूद किती?

भारतीय विद्यार्थ्यांच्या परदेशातील स्व-विलगीकरणासाठी तब्बल १० कोटी रुपयांची तरतूद पूनावाला यांनी के ली असून ही मदत मिळवण्यासाठी अर्ज करण्याचे आवाहनही के ले आहे. अर्ज करण्यासाठी पूनावाला यांच्याकडून ट्विटर खात्यावर लिंक उपलब्ध करून देण्यात आली आहे.

आकड्यांच्या भाषेत…

जानेवारी २०२१च्या आकडेवारीनुसार ८५ देशांमध्ये १० लाखांहून अधिक विद्यार्थी शिकत आहेत. त्यातील निम्म्याहून अधिक अमेरिकेतील विद्यापीठांमध्ये आहेत. गेल्या तीन महिन्यांमध्ये कोव्हिशिल्ड घेऊन परदेशी शिक्षणासाठी जाणाऱ्या विद्यार्थ्यांत भर पडत आहे.

नव्या नियमावलीप्रमाणे युरोपातील काही देशांमध्ये अद्यापही कोव्हिशिल्ड घेतलेल्या विद्यार्थ्यांना थेट प्रवेश मिळणार नाही. त्यांना स्व-विलगीकरण पूर्ण करावे लागेल. त्यासाठी  आर्थिक तरतुदीची गरज लागणार आहे. विद्यार्थ्यांचा त्यांनी शिक्षणासाठी निवडलेल्या देशातील प्रवेश सुकर व्हावा आणि त्यासाठी कोणताही आर्थिक भुर्दंड त्यांना पडू नये म्हणून ही जबाबदारी उचलणे मला आवश्यक वाटते.   – अदर पूनावाला

Loksatta Telegram लोकसत्ता आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@Loksatta) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.

मराठीतील सर्व पुणे बातम्या वाचा. मराठी ताज्या बातम्या (Latest Marathi News) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App. ताज्या बातम्या (latest News) फेसबुक , ट्विटरवरही वाचता येतील.

Web Title: Helping covishield students abroad adar poonawalla chief executive officer serum institute akp

Next Story
उसने पैसे वेळेत न दिल्यामुळे अंगावर अ‍ॅसिड टाकले