पुणे : ”आजवर प्रत्येक निवडणूक भाजपाचे नेते खासदार गिरीश बापट यांच्या नेतृत्वाखाली झाली आहे. ही पोटनिवडणूकदेखील त्यांच्याच नेतृत्वाखाली होणार असून, कसबा पेठ विधानसभा पोटनिवडणुकीत भाजपाच गड राखणार,” अशी भूमिका कसबा पेठ विधानसभा मतदारसंघाचे भाजपाचे उमेदवार हेमंत रासने यांनी मांडली.

या बातमीसह सर्व प्रीमियम कंटेंट वाचण्यासाठी साइन-इन करा

कसबा पेठ विधानसभा मतदारसंघाच्या आमदार मुक्ता टिळक आणि चिंचवड विधानसभा मतदारसंघाचे आमदार लक्ष्मण जगताप यांच्या निधनामुळे रिक्त झालेल्या जागेवर पोटनिवडणुक जाहीर झाली आहे. त्या निवडणुकीकरिता आज भाजपाकडून कसबा पेठ विधानसभा मतदारसंघासाठी हेमंत रासने, तर चिंचवड विधानसभा मतदारसंघासाठी आमदार लक्ष्मण जगताप यांच्या पत्नी अश्विनी जगताप यांना उमेदवारी जाहीर करण्यात आली.

हेही वाचा – पुणे : आभासी चलनात गुंतवणुकीच्या आमिषाने १४ लाखांची फसवणूक

उमेदवारी जाहीर होताच हेमंत रासने यांनी श्रीमंत दगडूशेठ हलवाई गणपती मंदिरात जाऊन आरती केली. त्यानंतर हेमंत रासने यांच्याशी संवाद साधला असता, आजवर माझ्यावर पक्षाने जी जबाबदारी दिली ती मी समर्थपणे पार पाडली असून, नगरसेवक, स्थायी समिती अध्यक्ष म्हणून काम पाहिले. त्या माध्यमातून शहराच्या विकासाच्या दृष्टीने विविध काम करण्याची संधी पक्षाने दिली. आता विधानसभा निवडणूक लढविण्याची संधी दिली असून त्या निवडणुकीत देखील आमच्या पक्षाचा विजयी निश्चित आहे. ही निवडणूक बिनविरोध व्हावी अशी आमच्या नेत्यांनी सर्व पक्षाच्या नेत्यांना विनंती केली होती. मात्र, अद्यापपर्यंत काही झाले नाही. अजून दोन दिवस बाकी आहे, असे त्यांनी सांगितले.

हेही वाचा – Kasabapeth ByPoll : भाजपाकडून मुक्ता टिळकांच्या कुटुंबाहेरील व्यक्तीला उमेदवारी; चंद्रकांत पाटील म्हणाले, “आम्ही…”

मुक्ता टिळक यांच्या कुटुंबीयांपैकी कोणाला तरी संधी दिली जाईल, असे म्हटले जात होते. आता त्यांच्या कुटुंबातील व्यक्तीला संधी दिली नाही, त्यामुळे मतदारांमध्ये नाराजी असणार, त्यावर हेमंत रासने म्हणाले की, भाजप आमचे कुटुंब असून आम्ही सर्वजण पक्षाचा आदेश पाळणारे आहोत. टिळक कुटुंबातील कोणीही नाराज नाही आणि मतदारामध्ये देखील नाराजी नसणार, आजवर कसबा पेठ मतदारसंघातील भाजपा उमेदवारच्या पाठीशी राहिले आहेत, त्याप्रमाणे माझ्या देखील पाठीशी राहतील, असा विश्वास यावेळी त्यांनी व्यक्त केला. तसेच कुणाल टिळक यांच्यावर देखील पक्षाने जबाबदारी दिली असल्याचे त्यांनी सांगितले.

Pune News (पुणे न्यूज), Maharashtra News, Marathi News (मराठीतील बातम्या) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.
Web Title: Hemant rasane reaction after getting kasba by election ticket pune svk 88 ssb
First published on: 04-02-2023 at 14:04 IST