high voltage power cables burnt in garbage fire in pune pune print news zws 70 | Loksatta

पुणे : कचऱ्यामुळे वीजवाहिन्या जळून  बालेवाडी, बाणेर परिसर अंधारात

घटनेची माहिती मिळाल्यानंतर महावितरणकडून वीजवाहिन्यांच्या दुरुस्तीचे काम हाती घेण्यात आले. मात्र

पुणे : कचऱ्यामुळे वीजवाहिन्या जळून  बालेवाडी, बाणेर परिसर अंधारात
कचऱ्याला लागली आगीमुळे वीजवाहिन्या जळाल्या

कचऱ्याला लागलेल्या आगीमध्ये विजेच्या उच्चदाब वाहिन्या जळाल्याने बालेवाडी आणि बाणेर परिसरातील वीजपुरवठा शुक्रवारी संध्याकाळी खंडित झाला. त्यामुळे ऐन पावसात नागरिकांचे हाल झाले. रात्री उशिरापर्यंत वीजपुरवठा सुरळीत झाला नव्हता.

महावितरणकडून देण्यात आलेल्या माहितीनुसार, बाणेर भागातील महाबळेश्वर हॉटेलच्या जवळील कचऱ्याला संध्याकाळी पाचच्या सुमारास आग लागली होती. या आगीचा फटका या भागातून जाणाऱ्या चार उच्चदाब वीज वाहिन्यांनाही बसला. वाहिन्यांनाही आग लागून त्या जळाल्या. त्यामुळे बाणेर, परिसरासह बालेवाडी भागातील अनेक भागांतील वीजपुरवठा खंडित झाला. जुनी सांगवी भागातील वीजपुरवठ्यालाही त्याचा फटका बसला.

घटनेची माहिती मिळाल्यानंतर महावितरणकडून वीजवाहिन्यांच्या दुरुस्तीचे काम हाती घेण्यात आले. मात्र, उच्चदाब वाहिन्यांचे काम असल्याने त्याला विलंब झाला. त्यामुळे रात्री उशिरापर्यंत अनेक भागात वीजपुरवठा बंदच होता. कचऱ्याला नेमकी आग कशी लागली, हे समजू शकले नसल्याचे महावितरणकडून स्पष्ट करण्यात आले. वीज यंत्रणा किंवा वीजवाहिन्या जात असलेल्या भागामध्ये कचरा टाकू नये किंवा असलेला कचरा जाळू नये, असे आवाहन महावितरणकडून करण्यात आले आहे.

मराठीतील सर्व पुणे ( Pune ) बातम्या वाचा. मराठी ताज्या बातम्या (Latest Marathi News) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.

Next Story
“मला पेंग्विन म्हटल्याचा अभिमान, आता कोस्टल रोड सेना असे…” विरोधकांच्या टीकेला आदित्य ठाकरेंचे प्रत्युत्तर

संबंधित बातम्या

स्वारगेट परिसरातील जुगार अड्ड्यावर छापा ; १७ जणांविरुद्ध गुन्हे शाखेची कारवाई
पुणे: शिवाजीनगर, डेक्कन परिसरात गुरुवार, रविवार वीजपुरवठा बंद
पुण्यातून व्यापाऱ्याचे अपहरण करणारा आरोपी राजस्थानमध्ये जेरबंद; प्रेमसंबंधातून अपहरणाचा प्रकार
पुण्यातील शिवसेनेची पहिली यादी सोमवारी – विनायक निम्हण

व्हिडिओ

ताज्या बातम्या
पाथरीकरांची ‘श्रद्धा’ पण शासनाची ‘सबुरी’!; साईबाबा तीर्थक्षेत्र आराखडा तीन वर्षांपासून रखडला
रेल्वेमुळे तुळजापूर, उस्मानाबादच्या विकासाचा मार्ग मोकळा
स्मृतिभ्रंश आजार बरा करणारे औषध शोधण्यात यश ; वृद्धांना मोठा दिलासा
आरोग्य वार्ता : ‘फ्लू’ची लस हृदयरुग्णांसाठी लाभदायी
FIFA World Cup 2022 : अर्जेटिनाची पोलंडवर मात; दोन्ही संघ बाद फेरीत