पिंपरी-चिंचवड महापालिकेच्यावतीने आयोजित करण्यात आलेल्या महापौर चषक आंतरराष्ट्रीय कुस्ती स्पर्धेत रविवारी भारताच्या जोगिंदर कुमारने इराणच्या पैलवानाला अस्मान दाखवले. अत्यंत चुरशीच्या झालेल्या लढतीत हिंद केसरी जोगिंदर कुमारने इराणच्या रेझा हैदरी याचा पराभव करत महापौर चषकाची चांदीची गदा पटकावली. पिंपरी-चिंचवड महानगरपालिकेच्या वतीने मोशी येथे ही कुस्ती स्पर्धा आयोजित करण्यात आली होती.

या बातमीसह सर्व प्रीमियम कंटेंट वाचण्यासाठी साइन-इन करा

या स्पर्धेत हिंद केसरीसह १५८ मल्ल सहभागी झाले होते. जोगिंदर कुमारने हिंद केसरी आणि भारत केसरी स्पर्धेत अजिंक्यपद मिळवले आहे. तर रेझा हैदरी हा देखील आंतरराष्ट्रीय पातळीवरील नावाजलेला मल्ल आहे. मात्र, जोगिंदर कुमारने रेझा हैदरी याचा पराभव करण्यात यश मिळवले. याशिवाय, इराण विरुद्ध भारत लढतीत इराणच्या जलाल शबानी याला राजू हिप्परकर याने चीत करत विजय मिळवला. या दोघांची कुस्ती ही १५ मिनिटे चालली. तर सईद मोहम्मद घोली या इराणच्या पैलवानाला प्रसाद सस्ते याने चीत केले. पैलवान राहुल आवारे याने इराणच्या जावेद शबानीला अस्मान दाखवले. त्यानंतर सर्वांचे लक्ष लागून राहिलेल्या कुस्तीत जोगिंदरने रेजा हैदरीचा पराभव करत महापौर चषकावर स्वत:चे नाव कोरले.

Pune News (पुणे न्यूज), Maharashtra News, Marathi News (मराठीतील बातम्या) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.
Web Title: Hind kesari joginder kumar defeat iran wrestler reza haidri
First published on: 16-10-2017 at 09:23 IST