scorecardresearch

भाजपाचा पराभव आमच्यामुळे झाल्याची खंत, पण पश्चाताप नाही! हिंदू महासंघाचे अपक्ष उमेदवार आनंद दवे यांची प्रतिक्रिया

भाजपाचा पराभव आमच्यामुळे झाला, याची खंत जरूर आहे, पण पश्चाताप नाही, अशी प्रतिक्रिया आनंद दवे यांनी दिली.

Anand Dave on bjp loss
हिंदू महासंघाचे अपक्ष उमेदवार आनंद दवे

पुणे : भाजपाचा पराभव आमच्यामुळे झाला, याची खंत जरूर आहे, पण पश्चाताप नाही, अशी प्रतिक्रिया हिंदू महासंघाचे अपक्ष उमेदवार आनंद दवे यांनी दिली आहे.

हेही वाचा – कसब्यात परिवर्तन, भाजपाच्या बालेकिल्ल्याला सुरुंग

हेही वाचा – Kasba By Poll Election Result 2023 : कसब्यातील पराभवासाठी कोण जबाबदार? भाजपाचे हेमंत रासने म्हणतात, “माझ्या दृष्टीने हा निकाल…!”

कसबा, सदाशिव, नारायण येथील सर्व मतदारांनी या वेळेस भाजपाच्या विरोधात मतदान केले आहे. गेल्या वेळेस या प्रभागात मुक्ता टिळक यांना वीस हाजारांचे मताधिक्य मिळाले होते. या वेळेस भाजपा येथून १ हजार ४०० मतांनी मागे पडला. बेगडी हिंदुत्वाच्या विरोधात, आर्थिक आरक्षण नाकारणे आणि प्रामाणिक, पारंपरिक मतदारांना गृहीत धरणे याचा राग आमच्यामुळे व्यक्त झाला, असे दवे यांनी सांगितले.

मराठीतील सर्व पुणे ( Pune ) बातम्या वाचा. मराठी ताज्या बातम्या (Latest Marathi News) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.

First published on: 02-03-2023 at 13:09 IST
ताज्या बातम्या