scorecardresearch

पुणे: मी तपास यंत्रणांचा बळी; हिंदू राष्ट्र सेनेच्या धनंजय देसाई याची न्यायालयीन निर्णयावर प्रतिक्रिया

मोहसीन शेख खून प्रकरणात मी तपास यंत्रणांचा बळी ठरलो. तत्कालिन काँग्रेस-राष्ट्रवादी आघाडीने हिंद्त्ववादी विचारांच्या कार्यकर्त्यांना मोहसीन शेख खून प्रकरणात लक्ष्य केले.

dhananjay-desai
धनंजय देसाई

मोहसीन शेख खून प्रकरणात मी तपास यंत्रणांचा बळी ठरलो. तत्कालिन काँग्रेस-राष्ट्रवादी आघाडीने हिंद्त्ववादी विचारांच्या कार्यकर्त्यांना मोहसीन शेख खून प्रकरणात लक्ष्य केले. पोलिसांना तशा सूचना दिल्या. मी तपास यंत्रणांचा बळी ठरलो, अशी प्रतिक्रिया हिंदू राष्ट्र सेनेचे धनंजय देसाई याने पत्रकारांशी बोलताना व्यक्त केली.

हेही वाचा >>>“…तर मी माझ्या मिशा काढेन!” नितीन गडकरी यांनी धीरुभाई अंबानी यांना दिलं होत चॅलेंज; वाचा संपूर्ण किस्सा

संगणक अभियंता मोहसीन शेख खून प्रकरणात हिंदू राष्ट्र सेनेचा धनंजय देसाई याच्यासह २१ जणांची विशेष न्यायाधीश एस. बी. साळुंखे यांनी सबळ पुराव्यां अभावी निर्दोष मुक्तता करण्याचे आदेश दिले. त्यानंतर धनंजय देसाई यांनी न्यायालयाच्या निर्णयावर समाधान व्यक्त केले. देसाई याने पत्रकार परिषदेत घेऊन त्याची बाजू मांडली. मोहसीन शेख याचा खून हिंदू राष्ट्र सेनेच्या कार्यकर्त्यांनी केल्याचा ठपका ठेवला. न्यायालयाने माझ्यासह कार्यकर्त्यांची निर्दोष मुक्तता केल्याने समाधान वाटते. शेख याचा खून जमावाने केला. माझ्यासह कार्यकर्त्यांना शेख याच्या खून प्रकरणात गोवण्यात आले. पोलिसांनी शेख याच्या मारेकऱ्यांना शोधायला हवे. मी निर्दोष होतो. न्यायालयाने सबळ पुराव्याअभावी आमची मुक्तता केली. खटल्याचे कामकाज सुरू असताना एकाही साक्षीदाराने आम्हालाा ओळखले नाही. हिंदू राष्ट्र सेनेचे कार्यकर्ते फक्त हडपरसर भागात नसून संपूर्ण देशभरात असल्याचे देसाई याने नमूद केले.

मराठीतील सर्व पुणे ( Pune ) बातम्या वाचा. मराठी ताज्या बातम्या (Latest Marathi News) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.

First published on: 27-01-2023 at 20:26 IST