डोक्यावर भगव्या टोप्या, हातामध्ये भगवे झेंडे, ‘जय श्रीराम’, ‘छत्रपती शिवाजी महाराज की जय’ आणि ‘छत्रपती संभाजी महाराज की जय’च्या घोषणा अशा वातावरणात निघालेल्या जनआक्रोश मोर्चाच्या माध्यमातून रविवारी पुण्यामध्ये अखिल हिंदू समाजाच्या एकजुटीचे दर्शन घडले. चार वर्षांच्या चिमुरडीपासून ८७ वर्षांच्या आजोबापर्यंत अनेक जणांनी तसेच विविध संस्था, संघटना आणि राजकीय पक्षांनी या मोर्चात उत्स्फूर्त सहभाग घेतला.  

धर्मवीर छत्रपती संभाजी महाराज यांचा बलिदान दिन म्हणजे फाल्गुन अमावस्या ‘धर्मवीर दिन’ जाहीर करावा, तसेच लव्ह जिहाद, धर्मांतर आणि गोहत्या यांच्या विरोधात कडक कायदे करून त्यांची अंमलबजावणी व्हावी, या प्रमुख मागण्यांसाठी सकल हिंदू समाजाच्या वतीने मोर्चाचे आयोजन करण्यात आले होते. छत्रपती घराण्याचे वंशज आमदार शिवेंद्रराजे भोसले, संत तुकाराम महाराजांचे वंशज शिवाजी महाराज मोरे, हिंदुत्ववादी नेते धनंजय देसाई आणि तेलंगणाचे आमदार राजा सिंह उर्फ राजा भैया यांची मोर्चात प्रमुख उपस्थिती होती.

Kolhapur district, election campaign, caste and religion issues, kolhapur, hatkanangale constituency
कोल्हापूरच्या पुरोगामी भूमीत जाती धर्माच्या आधारातून मतांची जुळवाजुळव
bjp leader ganesh naik campaign for his son sanjeev naik
गणेश नाईकांची पुत्र संजीव नाईकांसाठी मिरा-भाईंदर मध्ये मोर्चे बांधणी, जुन्या समर्थकांना सहकार्य करण्याचे भावनिक आवाहन
Nashik Lok Sabha, mahayuti, Candidate , Bhujbal Farm, Office Reflects Silent Tension, chhagan bhujbal, hemant godse, bjp,
नाशिकच्या जागेचा तिढा अन् भुजबळ फार्मची शांतता
Meenakshi Shinde
आचारसंहितेच्या कालावधीत बचतगटांना आनंद आश्रमातून अनुदान वाटप ? शिवसेनेच्या माजी महापौर मिनाक्षी शिंदेंविरोधात निवडणूक आयोगाकडे तक्रार

हेही वाचा – “‘लव्ह जिहाद’वर देशभरात बंदी घालावी”, तेलंगणाचे आमदार राजा भैय्या यांची मागणी; म्हणाले, “धर्मांतर..”

लाल महाल येथे राजमाता जिजाऊ यांना अभिवादन करून मोर्चाची सुरुवात झाली. त्यानंतर दगडूशेठ हलवाई गणपती येथे आरती केल्यानंतर हा मोर्चा लक्ष्मी रस्ता मार्गे डेक्कन जिमखाना येथील छत्रपती संभाजी महाराज यांच्या पुतळ्यापर्यंत आला. तेथे झालेल्या सभेनंतर मोर्चाची सांगता झाली.
शिवेंद्रराजे भोसले म्हणाले, मोर्चाच्या रुपाने मला हे भगवे वादळ दिसत आहे. हिंदू धर्माचे रक्षण झाले पाहिजे हीच आपली सर्वांची भावना असून देव, देश आणि धर्माच्या रक्षणात कोणतीही तडजोड होऊ शकत नाही. आम्ही कोणाचाही द्वेष करायला एकत्र आलेलो नाहीत. म्हणूनच आम्ही कोणाच्याही विरोधात घोषणा दिल्या नाहीत. छत्रपती संभाजी महाराजांचे स्मृतिस्थळ हे पर्यटनस्थळ म्हणून जाहीर न करता तीर्थस्थळ म्हणून जाहीर करावे.

राजा भैय्या म्हणाले, हा आक्रोश नसून हिंदूंची गर्जना आहे. महाराष्ट्रातील मावळ्यांइतके हिंदुत्व अन्यत्र दिसत नाही. धर्मांतराच्या विरोधात लढणे हे आपले सर्वांचे कर्तव्य आहे. गाय ही आमची माता असून आम्ही गाईची कत्तल होऊ देणार नाही. ज्या पुण्येश्वर मंदिरावरून पुण्याचे नाव पडले ते मंदिर अतिक्रमणातून मुक्त करण्यासाठी राज्य सरकारवर दबाव आणावा.

हेही वाचा – पुणे : ‘धर्मवीर’ हीच छत्रपती संभाजी महाराजांची ओळख, शिवेंद्रराजे भोसलेंनी केलं अजित पवारांना लक्ष्य

पुणे व्यापारी महासंघातर्फे पिण्याच्या पाण्याचे वाटप

हिंदू जनआक्रोश मार्चाचे स्वागत करून पुणे व्यापारी महासंघातर्फे १५ हजार पाणी बाटल्यांचे वितरण करण्यात आले. पुणे व्यापारी महासंघाचे अध्यक्ष फत्तेचंद रांका, सचिव महेंद्र पितळीया, उपाध्यक्ष अरविंद कोठारी, सहसचिव राहुल हजारे, यशस्वी पटेल, मनोज शहा, मिठालाल जैन, प्रल्हाद लड्ढा, संतोष पटवा या वेळी उपस्थित होते.