पिंपरी- चिंचवड: अमेरिकेतील नागरिकांची फसवणूक करणाऱ्या दोन अनधिकृत कॉल सेंटरचा सायबर पोलीस आणि गुन्हे शाखा दोनने पर्दाफाश केला आहे. लोनसाठी क्रेडिट स्कोर चांगला करून देण्याचा बहाण्याने अमेरिकन नागरिकांची फसवणूक केली जायची. याप्रकरणी कॉल सेंटर मालक आणि मॅनेजर विरुद्ध सायबर पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. दोन्ही कॉल सेंटरमधून २० हार्ड डिस्क आणि तीन लपटॉप जप्त करण्यात आले आहेत.
टेकला सोल्युशन कॉल सेंटरचा मालक धंनजय साहेबराव कासार, मॅनेजर हर्षद शंकर खामकर आणि स्काय सोल्युशनचा मालक सागर कुमार यादव, मॅनेजर आनंद पंकज सिन्हा यांच्या विरुद्ध गुन्हा दाखल करण्यात आला असून अटक करण्यात आली आहे. चौघांना न्यायालयाने १८ नोव्हेंबर पर्यंत पोलीस कोठडी सुनावली आहे.
सविस्तर माहिती अशी की, आयटी हब असलेल्या हिंजवडीतील फेज दोनमध्ये गेरा इमारतीत दोन्ही अनधिकृत कॉल सेंटर सुरू होते. ते थेट अमेरिकेतील नागरिकांशी संवाद साधायचे. अमेरिकेतील नागरिकांशी कस बोलायचं? कसा संवाद साधायचा यासाठी एक स्क्रिप्ट तयार करण्यात आली होती. तिथल्या नागरिकांचा डेटा संबंधित दोन्ही कॉल सेंटरकडे आढळून आला आहे. त्या डेटाद्वारे तिथल्या नागरिकांशी संवाद साधून लोन मिळवून देण्याच्या आमिषाने त्यांची फसवणूक केली जायची. कम्युनिटी चॉईस फायनान्सीयल कंपनीतून बोलत असल्याचं सांगून लोनसाठी क्रेडिट स्कोर सुधारून देण्यात येईल, अस अमिश दाखवून त्यांच्याकडून वेगवेगळ्या कंपनीचे कुपन घेऊन ते डॉलरमध्ये बदलून घेत. दुसऱ्या पद्धतीने देखील अमेरिकन नागरिकांची फसवणूक केली जात होती.
अमेरिकेतील मेडिकल हेल्थ डिपार्टमेंटमधून बोलत असल्याचं सांगून राउंड अप, टाल्कम पावडर, झानटॅक औषधे इत्यादी वापरतात. यामुळे काही जणांना वेगवेगळा कर्क रोग झाल्याचं पोलीस सांगतात. हेच हेरून कॉल संबंधित औषधा विरोधात कोर्टात जाऊन चांगले पैसे मिळवून देऊ अस आमिष दाखवून त्यांच्याकडून सविस्तर माहिती घेऊन ती अमेरिकेतील त्रयस्थ संस्थेला विकून त्यामाध्यमातून पैसे कमावले जात होते. अखेर या दोन्ही अनधिकृत कॉल सेंटरवर सायबर पोलीस पोलीस निरीक्षक किरण नाळे आणि गुन्हे शाखा युनिट दोन चे पोलीस निरीक्षक अरविंद पवार यांच्या टीमने छापा टाकून रंगेहाथ पकडले. दोन्ही करवाईमध्ये २० हार्डडिस्क आणि तीन लॅपटॉप पोलिसांनी जप्त केले आहेत.
