पुणे: नांदण्यास नकार दिल्याने 'एचआयव्ही'बाधित पतीकडून पत्नीवर चाकू हल्ला; बिबवेवाडी भागातील घटना | HIV infected husband stabs wife for refusing to sleep pune print news rbk 25 amy 95 | Loksatta

पुणे: नांदण्यास नकार दिल्याने ‘एचआयव्ही’बाधित पतीकडून पत्नीवर चाकू हल्ला; बिबवेवाडी भागातील घटना

नांदण्यास नकार दिल्याने पतीने पत्नीवर चाकू हल्ला केल्याची घटना बिबवेवाडी भागात घडली. या घटनेत पत्नी गंभीर जखमी झाली असून तिच्यावर खासगी रुग्णालयात उपचार सुरू आहेत.

knife attack
नांदण्यास नकार दिल्याने 'एचआयव्ही'बाधित पतीकडून पत्नीवर चाकू हल्ला(संग्रहित छायचित्र)/ लोकसत्ता

नांदण्यास नकार दिल्याने पतीने पत्नीवर चाकू हल्ला केल्याची घटना बिबवेवाडी भागात घडली. या घटनेत पत्नी गंभीर जखमी झाली असून तिच्यावर खासगी रुग्णालयात उपचार सुरू आहेत.या प्रकरणी पतीच्या विरोधात गुन्हा दाखल करण्यात आला असून तो पसार झाला आहे. याबाबत २७ वर्षीय पत्नीने बिबवेवाडी पोलीस ठाण्यात फिर्याद दिली आहे.

हेही वाचा >>>पुणे: विवाहाच्या आमिषाने अल्पवयीन मुलीवर अत्याचार; मोबाइलवर ध्वनिचित्रफीत, छायाचित्र काढून मुलीला धमकावले

तक्रारदार महिलेचा पती सोलापूर जिल्ह्यातील माढा तालुक्यातील आहे. तो एचआयव्ही बाधित आहे. त्यामुळे पत्नी त्याच्यापासून विभक्त राहत आहेत. बिबवेवाडीतील सुखासागरनगर भागात ती राहायला आहे. पतीने पत्नीला नांदण्यासाठी आग्रह धरला होता. पत्नीने नांदण्यास नकार दिल्याने तो चिडला होता. बिबवेवाडीतील हिरामण बनकर शाळेजवळ पतीने पत्नीवर चाकूने वार केले.पसार झालेल्या पतीचा शोध घेण्यात येत असून पोलीस उपनिरीक्षक छाया गादिलवाड तपास करत आहेत.

मराठीतील सर्व पुणे ( Pune ) बातम्या वाचा. मराठी ताज्या बातम्या (Latest Marathi News) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.

First published on: 26-01-2023 at 17:25 IST
Next Story
संजय राऊत यांच्या भूमिकेने ‘कसब्या’त शिवसेनेची कोंडी? आत्ता नाही तर पुन्हा कधी? शिवसेना पदाधिका-यांचा सवाल