पिंपरी-चिंचवड : पिंपरी-चिंचवड शहरात बंडखोर शिवसेना नेते, मंत्री एकनाथ शिंदेच्या समर्थनात फलक लावण्यात आले आहेत. सोमवारी शिवसेना पदाधिकारी, कार्यकर्त्यांची बैठक आकुर्डीत पार पडली. शिवसेना उपनेते सचिन अहिर यांनी पदाधिकाऱ्यांना संबोधित केले. त्यानंतर आज शहरात काही ठिकानी एकनाथ शिंदेच्या समर्थनात फलक लागलेले दिसत आहेत. यामागे नेमके शिवसैनिकच आहेत की भाजप अशी चर्चा आहे. पैकी, काही फलक फाडण्यात आले आहेत.  शिवसेनेत उभी फूट पाडणारे शिवसनेचे बंडखोर नेते एकनाथ शिंदेच्या समर्थनात पिंपरी-चिंचवड शहरात फ्लेक्स लागले आहेत. एकनाथ शिंदे साहेब समर्थक अस फलकावर नमूद असून हे फलक कोणी लावले याची जोरदार चर्चा आहे. पिंपरी-चिंचवड शहरात राजकीय दृष्ट्या भाजप ची मोठी ताकद आहे. महानगर पालिकेवर त्यांची सत्ता होती. शिवसेना खासदार श्रीरंग बारणे वगळता शहरात मोठी व्यक्ती कोणी नाही. काल सोमवारी आमदार सचिन अहिर यांच्या उपस्थितीत शिवसैनिकांची बैठक पार पडली. सर्वच शिवसैनिकांनी एकनाथ शिंदेच्या विरोधात नाराजी व्यक्त केली होती. परंतु, आज शहरात काही ठिकाणी एकनाथ शिंदेच्या समर्थनात लागलेले फलक कोणी लावले असा प्रश्न उपस्थित होत होतोय, शिवसैनिक किंवा भाजप ने फलक लावल्याची राजकीय वर्तुळात चर्चा आहे. 

shivraj patil chakurkar , shivajirao patil nilangekar
काँग्रेसच्या प्रचारातून चाकुरकर, निलंगेकराचे छायाचित्र गायब
mayawati bsp in up loksabha
बसपच्या मुस्लिम, ब्राह्मण उमेदवार यादीमुळे इंडिया आघाडीसमोर नवे आव्हान; पारंपरिक व्होट बँकेवर कसा होणार परिणाम?
shrikant shinde
“राज ठाकरे महायुतीत आले, तर…”; मनसेच्या युतीतील प्रवेशाच्या चर्चांवर श्रीकांत शिंदेंची प्रतिक्रिया
Beed Lok Sabha
बीडमधील प्रचाराला ‘राज’कन्या विरुद्ध ‘शेतकरी पुत्र’ लढतीचा रंग