scorecardresearch

नावीन्यपूर्ण पद्धतीने अध्यापन करणाऱ्या शिक्षकांचा सन्मान; नॅशनल आयटी एज्युकेटर पुरस्कार प्रदान

जिल्हा परिषद शाळांमध्ये माहिती तंत्रज्ञान शिकवणाऱ्या आणि नावीन्यपूर्ण काम करणाऱ्या शिक्षकांचा पी. ए. इनामदार कॉलेज ऑफ व्हिज्युअल इफेक्ट्सतर्फे नॅशनल आयटी एज्युकेटर पुरस्कार देऊन गौरव करण्यात आला.

पुणे : जिल्हा परिषद शाळांमध्ये माहिती तंत्रज्ञान शिकवणाऱ्या आणि नावीन्यपूर्ण काम करणाऱ्या शिक्षकांचा पी. ए. इनामदार कॉलेज ऑफ व्हिज्युअल इफेक्ट्सतर्फे नॅशनल आयटी एज्युकेटर पुरस्कार देऊन गौरव करण्यात आला. पुरस्कारप्राप्त शिक्षकांमध्ये उमेश खोसे, मृणाल गंजाळे, नागनाथ विभुते, प्रकाश चव्हाण, शफी शेख, आनंदा अनेमवाड यांचा समावेश आहे. 

महाविद्यालयातर्फे आयोजित कार्यक्रमात पुणे जिल्हा परिषदेचे मुख्य कार्यकारी अधिकारी आयुष प्रसाद, महाराष्ट्र कॉस्मोपॉलिटन एज्युकेशन सोसायटीचे अध्यक्ष डॉ. पी. ए. इनामदार यांच्या उपस्थितीत पुरस्कार प्रदान करण्यात आले. संस्थेचे सचिव प्रा. इरफान शेख, डॉ. ऋषी आचार्य, अंजुम काजळेकर आदी या वेळी उपस्थित होते. यंदा या पुरस्कारांचे बारावे वर्ष होते.  पै आयटी ऑलिम्पियाडमध्ये सहा हजार विद्यार्थ्यांनी सहभाग घेतला.

नागनाथ विभुते यांनी ‘लर्निग विथ अलेक्सा’ हा अभिनव उपक्रम केला. शफी शेख यांनी ‘मित्र’ अ‍ॅपद्वारे अध्ययन सोपे करतानाच प्लॅस्टिकचे प्रदूषण कमी करण्याचा प्रयत्न केला. मृणाल गंजाळे यांनी ‘पपेट इन एज्युकेश‘‘ या उपक्रमातून आनंददायी शिक्षणावर भर दिला. आनंदा अनेमवाड यांनी स्वत:च्या पहिल्या पगारातून विद्यार्थ्यांच्या अध्ययनासाठी लॅपटॉप घेतला. प्रकाश चव्हाण यांनी यू टय़ूब साधनांनी विद्यार्थ्यांना शिकवले. उमेश खोसे यांनी बंजारा समाजातील विद्यार्थ्यांना संगणक ज्ञान देण्यावर भर दिला.

संगणक, माहिती तंत्रज्ञान क्रांतीने मानवी कामाच्या कक्षा रुंदावल्या आहेत. पुढील जगात कल्पक व्यक्तींना रोजगार असतील. ते मिळण्यासाठी ज्ञान आणि संगणक माहिती तंत्रज्ञान आवश्यक असेल. फक्त शैक्षणिक साधनांची निर्मिती करून भागणार नाही, त्याचा विद्यार्थ्यांनी किती उपयोग केला, याचा शोध घेतला पाहिजे, असे प्रसाद यांनी सांगितले.

मराठीतील सर्व पुणे ( Pune ) बातम्या वाचा. मराठी ताज्या बातम्या (Latest Marathi News) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.

Web Title: Honoring teachers teach innovative way awarded national it educator award ysh

ताज्या बातम्या