जंगली महाराज रस्त्यावरील हॉटेलमधील गल्ल्यातील २२ हजारांची रोकड चोरी करून पसार झालेल्या मॅनेजरला शिवाजीनगर पोलिसांनी शिताफीने तपास करून अवघ्या बारा तासांच्या आत अटक केली. अजय सुरेश सक्सेना (रा. लिंकरोड, मुंबई, मूळ. रा. उत्तरप्रदेश) असे अटक करण्यात आलेल्याचे नाव आहे.

या बातमीसह सर्व प्रीमियम कंटेंट वाचण्यासाठी साइन-इन करा

जंगली महाराज रस्त्यावर एका हॉटेलमध्ये आठ दिवसांपूर्वीच सक्सेना हा मॅनेजर म्हणून कामाला लागला होता. हॉटेलच्या गल्ल्यामध्ये साठलेली २२ हजारांची रक्कम घेऊन सक्सेना पळून गेला. हा प्रकार हॉटेलच्या सीसीटीव्ही मध्ये चित्रित झाला होता. याप्रकरणी शिवाजीनगर पोलिस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला.

शिवाजीनगर पोलिस आरोपीचा शोध घेत होते. तपास अधिकारी अतुल क्षीरसागर, शरद राऊत, बशीर सय्यद यांच्या पथकाने तपास करून आरोपीला गणेश पेठ मासळी बाजार. परिसरात पकडले. वरीष्ठ पोलीस निरीक्षक अरविंद माने, पोलीस निरीक्षक (गुन्हे) विक्रम गौड, यांच्या मार्गर्शनाखाली पोलीस उपनिरिक्षक अतुल क्षीरसागर यांच्या पथकाने ही कारवाई केली. सक्सेना याने दारू आणि मौजमजेसाठी पैसे उडवल्याचे उघडकीस आले आहे.

Pune News (पुणे न्यूज), Maharashtra News, Marathi News (मराठीतील बातम्या) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.
Web Title: Hotel manager arrest for robbing 22 thousands for alcohol pune print news scsg
First published on: 20-05-2022 at 12:10 IST