ग्रामीण भागातील हॉटस्पॉट गावांची संख्या घटली ; ३४ गावांमध्ये दहाहून अधिक रुग्ण

करोनाची दुसरी लाट सुरू झाल्यानंतर ग्रामीण भागात एप्रिलमध्ये हॉटस्पॉट गावांची संख्या ४६५ पर्यंत पोहोचली होती.

Corona
(प्रातिनिधीक छायाचित्र)

पुणे : शहरासह जिल्ह्यातील करोना रुग्णांची संख्या कमी झाली आहे. त्यामुळे ग्रामीण भागातील हॉटस्पॉट गावांची संख्यादेखील घटली आहे. सध्या ग्रामीण भागात केवळ ३४ गावे हॉटस्पॉट आहेत. या गावांमध्ये  दहापेक्षा अधिक करोनाचे रुग्ण असल्याने ही हॉटस्पॉट गावे म्हणून गणली जात आहेत.

करोनाची दुसरी लाट सुरू झाल्यानंतर ग्रामीण भागात एप्रिलमध्ये हॉटस्पॉट गावांची संख्या ४६५ पर्यंत पोहोचली होती. त्यानंतर मे महिन्यात कमी होऊन ३९७ आणि जूनमध्ये १८६ पर्यंत कमी झाली.

सप्टेंबर महिन्यात ही संख्या १०० होती. दुसऱ्या लाटेमध्ये पहिल्यांदाच हॉटस्पॉट गावांची संख्या ५० पेक्षा कमी झाली आहे. ऑक्टोबर महिन्याच्या सुरुवातीला हॉटस्पॉट गावांची संख्या ८९ होती, ती ऑक्टोबर अखेरीला ३४ पर्यंत कमी झाली आहे.

सर्वाधिक क्रियाशील रुग्ण

वाघोली आणि मंचर प्रत्येकी ५०, मांडवगाव फराटा ३०, अवसरी २८, निरगुडसर २३, नारायणगाव २२, ओतूर, घोडेगाव आणि पिंपळगाव प्रत्येकी २१, आळेफाटा २०.

Loksatta Telegram लोकसत्ता आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@Loksatta) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.

मराठीतील सर्व पुणे बातम्या वाचा. मराठी ताज्या बातम्या (Latest Marathi News) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App. ताज्या बातम्या (latest News) फेसबुक , ट्विटरवरही वाचता येतील.

Web Title: Hotspot villages in rural areas reduce due to corona patients decreased zws

Next Story
उसने पैसे वेळेत न दिल्यामुळे अंगावर अ‍ॅसिड टाकले
ताज्या बातम्या