गृहनिर्माण संस्थांचा कचरा न उचलण्याचा निर्णय रद्द करावा ; आमदार लक्ष्मण जगताप यांची आयुक्तांना सूचना | housing society garbage mla lakshman jagtap instruction commissioner shekhar sinh pimpri | Loksatta

गृहनिर्माण संस्थांचा कचरा न उचलण्याचा निर्णय रद्द करावा ; आमदार लक्ष्मण जगताप यांची आयुक्तांना सूचना

महापालिकेने सहकारी गृहनिर्माण संस्थांनी कचऱ्याची विल्हेवाट लावण्यासाठी त्यांच्याच आवारात प्रकल्प उभारणे बंधनकारक केले आहे.

गृहनिर्माण संस्थांचा कचरा न उचलण्याचा निर्णय रद्द करावा ; आमदार लक्ष्मण जगताप यांची आयुक्तांना सूचना
संग्रहित छायाचित्र

पिंपरी : शहरातील गृहनिर्माण सोसायट्यांना त्यांच्याच आवारात ओल्या कचऱ्याची विल्हेवाट लावण्याची सक्ती करणे योग्य नाही. जागा उपलब्ध असलेल्या सोसायट्यांमध्ये महापालिकेने स्वतःचा निधी देऊन ओल्या कचऱ्यावर प्रक्रिया करणारी यंत्रणा उभारावी. त्याचप्रमाणे, गृहनिर्माण संस्थांचा कचरा न उचलण्याच्या निर्णयाला बेमुदत स्थगिती द्यावी, अशी सूचना आमदार लक्ष्मण जगताप यांनी आयुक्त शेखर सिंह यांना केली आहे.

यासंदर्भात आमदार जगतापांनी आयुक्तांना पत्र दिले आहे. मोठ्या सहकारी गृहनिर्माण संस्थामधील ओला कचरा न उचलण्याचा निर्णय घेत महापालिकेने गृहनिर्माण संस्थाना नोटीसा जारी केल्या. त्यानुसार प्रतीदिन १०० किलो ओला कचरा निर्माण करणाऱ्या सहकारी गृहनिर्माण संस्थानी या कचऱ्याची विल्हेवाट लावण्यासाठी त्यांच्याच आवारात प्रकल्प उभारणे बंधनकारक केले आहे. असा प्रकल्प न उभारल्यास संबंधित गृहनिर्माण संस्थांचा कचरा महापालिका उचलणार नाही, अशी भूमिका प्रशासनाने जाहीर केली आहे. या तुघलकी निर्णयामुळे पालिकेच्या कारभाराबाबत मोठ्या प्रमाणावर रोष निर्माण झाला आहे.

हेही वाचा : पुणे जिल्ह्यात नियोजन आराखड्यातील कामांत फेरबदल? ४०० कोटींचा निधी वळविण्याची शक्यता

ओला कचरा उचलणे बंद करण्याचा नियम हा फक्त सहकारी गृहनिर्माण संस्थानाच का, असा प्रश्न या नागरिकांच्या मनात आहे. अनेक सोसायट्यांमध्ये कचरा प्रकल्पासाठी जागाच उपलब्ध नाही. प्रकल्पासाठी लागणारा निधी, वीज, पाणी व तज्ज्ञ मनुष्यबळाची कमतरता आहे. घनकचरा व्यवस्थापन प्रकल्प उभारणे आणि त्याचे संचालन करणे गृहनिर्माण सोसायट्यांना व्यावहारिकदृष्ट्या शक्य नाही. तरीही पालिकेने याबाबतचे फर्मान काढले आहे, याविषयी आमदारांनी आयुक्तांकडे नाराजी व्यक्त केली आहे.

हेही वाचा : एटीएममधून पैसे काढणाऱ्या तरुणावर हल्ला

गृहनिर्माण संस्थांमध्ये निर्माण होणारा ओला कचरा महापालिकेमार्फत उचलून घनकचरा व्यवस्थापनावर काम करणाऱ्या खासगी संस्थांना खत निर्मिसाठी द्यावा. खासगी संस्थांना प्रोत्साहन किंवा निधी देऊन गृहनिर्माण सोसायट्यांमधील घनकचरा उचलण्यास परवानगी द्यावी, खत निर्मितीसाठी इच्छुक सोसायट्यांना नियोजनसंदर्भात महापालिकेचे कोणतेही बंधन व नियंत्रण नसावे. या मुद्द्यावर कायमस्वरूपी तोडगा काढावा, त्यासाठी संयुक्त बैठक घ्यावी, अशी सूचना जगताप यांनी केली आहे.

मराठीतील सर्व पुणे ( Pune ) बातम्या वाचा. मराठी ताज्या बातम्या (Latest Marathi News) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.

Next Story
पुणे जिल्ह्यात नियोजन आराखड्यातील कामांत फेरबदल? ४०० कोटींचा निधी वळविण्याची शक्यता

संबंधित बातम्या

“विक्रम गोखले तीन महिन्यांपूर्वी पोलीस ठाण्यात आले होते, तेव्हा…”, वरीष्ठ पोलीस निरीक्षकांनी सांगितली ‘ती’ आठवण!
बोपदेव घाटात दुचाकीस्वार तरुणावर गोळीबार; पुण्यात दोन दिवसात गोळीबाराच्या तीन घटना
ज्येष्ठ अभिनेते विक्रम गोखलेंच्या निधनाने राजकीय वर्तुळात शोक; मुख्यमंत्री, उपमुख्यमंत्र्यांसह इतर नेत्यांनी वाहिली श्रद्धांजली
तरुणींसाठी ‘बडी कॉप व्हॉट्स अ‍ॅप’ समूह
पुणे : ३० हजारांच्या कर्जावर मागितले एक लाख रुपये व्याज; बेकायदा सावकारी करणारा जेरबंद

व्हिडिओ

ताज्या बातम्या
Video : भिंतीचा आधार घेत पार्टीतून बाहेर पडली सोहेल खानची पूर्वाश्रमीची पत्नी; नेटकरी म्हणाले, “धड चालताही…”
पैशांचा अपहार झालाय? चिंता करू नका, Cyber Fraud झाल्यावर या नंबरवर कॉल करा अन् पैसै वाचवा
“…तेव्हा तेव्हा विक्रमकाका तुमची उणीव भासत राहील” अमोल कोल्हे हळहळले
‘Squid Game’ या लोकप्रिय वेबसीरिजमधील अभिनेत्यावर लैंगिक शोषणाचा आरोप; पाच वर्षांपूर्वी घडलेला प्रकार आला समोर
“गुवाहाटीला जाण्यासाठी शिंदे गटाकडे पैसे कुठून आले?” चार्टर्ड विमानाच्या प्रवासावरून प्रश्नचिन्ह उपस्थित, चौकशीची मागणी