scorecardresearch

समाजमाध्यमातील समुहातून काढून टाकल्याने गृहनिर्माण सोसायटीच्या अध्यक्षांना मारहाण, पाच जणांविरोधात गुन्हा

सोसायटीच्या नावाने सुरू केलेल्या समाजमाध्यमातील समुहातून काढून टाकल्याने एकाला बेदम मारहाण करण्यात आली आहे.

समाजमाध्यमातील समुहातून काढून टाकल्याने गृहनिर्माण सोसायटीच्या अध्यक्षांना मारहाण, पाच जणांविरोधात गुन्हा
प्रातिनिधिक छायाचित्र

पुणे : सोसायटीच्या नावाने सुरू केलेल्या समाजमाध्यमातील समुहातून काढून टाकल्याने एकाला बेदम मारहाण करण्यात आल्याची घटना हडपसर भागातील एका सोसायटीच्या आवारात घडली.

या प्रकरणी सुरेश किसन पोकळे, सुयोग भरत शिंदे, अनिल म्हस्के, शिवराम पाटील, किसन पवार (सर्व रा. ओम हाईट्स सहकारी गृहनिर्माण संस्था, पीएमटी थांब्याजवळ, फुरसुंगी, सासवड रस्ता) यांच्या विरोधात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. याबाबत प्रीती किरण हरपळे (वय ३८, रा. ओम हाईट्स सहकारी गृहनिर्माण संस्था, पीएमटी थांब्याजवळ, फुरसुंगी, सासवड रस्ता) यांनी हडपसर पोलीस ठाण्यात फिर्याद दिली आहे. प्रीती हरपळे यांचे पती किरण ओम हाईट्स सहकारी गृहनिर्माण संस्थेचे अध्यक्ष आहेत. सोसायटीच्या नावाने हरपळे यांनी समाजमाध्यमात समूह तयार केला होता.

हेही वाचा – नगर जिल्ह्याच्या नामांतरावरून गोपीचंद पडळकर यांना राधाकृष्ण विखेंचा टोला, “बाहेरील कोणी येऊन त्यावर भाष्य करण्यापेक्षा….”

आरोपी सुरेश पोकळे यांनी किरण यांच्या मोबाइल क्रमांकावर संपर्क साधला. मला सोसायटीच्या नावाने सुरू केलेल्या समुहातून काढून का टाकले, अशी विचारणा पोकळे याने केली. त्यानंतर पोकळे किरण यांच्या कार्यालयात गेला. तेव्हा तुम्ही समुहावर कामाशिवाय अन्य संदेश पाठवत असल्याने समुहातून काढून टाकल्याचे किरण यांनी सांगितले. त्यानंतर पोकळे, साथीदार शिंदे, म्हस्के, पाटील, पवार यांनी किरण यांना बेदम मारहाण केली. पोलीस उपनिरीक्षक शेळके या प्रकरणाचा तपास करत आहेत.

मराठीतील सर्व पुणे ( Pune ) बातम्या वाचा. मराठी ताज्या बातम्या (Latest Marathi News) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.

First published on: 03-01-2023 at 16:25 IST

संबंधित बातम्या