बारावीचा निकाल ९९.६३ टक्के

राज्य मंडळाचे अध्यक्ष दिनकर पाटील म्हणाले, की करोनाच्या आव्हानात्मक परिस्थितीमध्ये निकालाची प्रक्रिया राबवण्यात आली.

९० टक्के किंवा त्याहून अधिक गुण मिळवणाऱ्या विद्यार्थ्यांमध्ये भरीव वाढ

पुणे : अंतर्गत मूल्यमापनामुळे यंदा राज्याचा दहावीनंतर बारावीचा निकालही घसघशीत लागला. बारावीचा निकाल ९९.६३ टक्के लागला असून, गेल्यावर्षीच्या तुलनेत ८.९७ टक्के निकाल वाढला आहे. कोकण विभागाचा निकाल सर्वाधिक ९९.८१ टक्के लागला. ४६ विद्यार्थ्यांना १०० टक्के गुण मिळाले, तर ९० टक्के किंवा त्यापेक्षा जास्त गुण मिळवलेल्या विद्यार्थ्यांची संख्या वाढली आहे.

राज्य मंडळाचे अध्यक्ष दिनकर पाटील यांनी मंगळवारी पत्रकार परिषदेत निकाल जाहीर के ला. मंडळाचे सचिव डॉ. अशोक भोसले या वेळी उपस्थित होते. यंदा करोनाच्या प्रादुर्भावामुळे बारावीची परीक्षा रद्द करून अंतर्गत मूल्यमापनाद्वारे निकाल जाहीर करण्याचा निर्णय राज्य शासनाने घेतला. अंतर्गत मूल्यमापनामध्ये दहावीसाठी ३० टक्के, अकरावीसाठी ३० टक्के आणि बारावीसाठी ४० टक्के भारांश देण्याचे सूत्र ठरवण्यात आले. त्यानुसार १३ लाख १४ हजार ९६५ विद्यार्थी उत्तीर्ण झाले, तर ४ हजार ७८९ विद्यार्थी अनुत्तीर्ण झाले. विज्ञान शाखेतील ५ लाख ४१ हजार ८०८, वाणिज्य शाखेतील ३ लाख ४९ हजार ६२, कला शाखेतील ३ लाख ७५ हजार ७९२, व्यवसाय अभ्यासक्रमातील ४८ हजार ३०४ विद्यार्थी उत्तीर्ण झाले. यंदाही विद्यार्थ्यांच्या तुलनेत विद्यार्थिनींच्या उत्तीर्णतेची टक्के वारी जास्त आहे. ९९.७३ टक्के विद्यार्थिनी आणि ९९.५४ टक्के विद्यार्थी उत्तीर्ण झाले. कोकण विभागाचा निकाल सर्वाधिक ९९.८१ टक्के, औरंगाबाद विभागाचा निकाल सर्वांत कमी ९९.३४ टक्के लागला.

गेल्या वर्षी ७ हजार ३४४ विद्यार्थ्यांना ९० टक्के किं वा त्यापेक्षा अधिक गुण मिळाले होते. तर यंदा त्यात भरीव वाढ होऊन ९१ हजार ४२० विद्यार्थ्यांना ९० टक्के किं वा त्यापेक्षा अधिक गुण मिळाले आहेत. एकू ण निकालात ९० टक्के किं वा त्यापेक्षा अधिक गुण मिळवलेले ६.७५ टक्के विद्यार्थी आहेत. कला शाखेत औरंगाबाद विभागातील सर्वाधिक १ हजार ९२, वाणिज्य शाखेत मुंबई विभागातील सर्वाधिक १ हजार २३, विज्ञान शाखेत पुणे विभागातील सर्वाधिक ९८५ आणि व्यावसायिक अभ्यासक्रम शाखेत अमरावती विभागातील सर्वाधिक २०२ कनिष्ठ महाविद्यालयांचा निकाल १०० टक्के लागला.

राज्य मंडळाचे अध्यक्ष दिनकर पाटील म्हणाले, की करोनाच्या आव्हानात्मक परिस्थितीमध्ये निकालाची प्रक्रिया राबवण्यात आली. त्यासाठी शिक्षकांची कार्यशाळा घेण्यात आली. शाळा-कनिष्ठ महाविद्यालये, शिक्षक, संस्थाचालक, अधिकारी अशा सर्वच घटकांनी के लेल्या सहकार्यामुळे बारावीच्या निकालाची प्रक्रिया राज्य मंडळाला पार पाडता आली.

पदवी अभ्यासक्रमांच्या प्रवेशांची सुरुवात

सर्व मंडळांनी बारावीचा निकाल जाहीर के ल्यानंतर विविध पदवी अभ्यासक्रमांची प्रवेश प्रक्रिया सुरू करण्याचे निर्देश विद्यापीठ अनुदान आयोगाने (यूजीसी) विद्यापीठांना दिले होते. त्यानुसार आता विद्यापीठांना त्यांच्या प्रवेश प्रक्रिया सुरू करण्याचा मार्ग मोकळा झाला आहे. तर व्यावसायिक अभ्यासक्रमांमध्ये अभियांत्रिकी, तंत्रज्ञान अभ्यासक्रमाच्या प्रवेशासाठी अनिवार्य असलेल्या जेईईच्या चौथ्या सत्राची परीक्षा नुकतीच झाली. वैद्यकीय प्रवेशासाठीची नीट १२ सप्टेंबरला होणार आहे. तर अभियांत्रिकी, औषधनिर्माणशास्त्र आणि कृषी अभ्यासक्रमासह विविध अभ्यासक्रमांसाठी राज्यातील एमएचटी-सीईटीची अर्ज प्रक्रिया सुरू असून, अद्याप परीक्षेची तारीख जाहीर झालेली नाही. त्यामुळे या प्रवेश परीक्षा, त्यांचे निकाल जाहीर होणे यावर पुढील प्रवेश प्रक्रिया अवलंबून आहे.

Loksatta Telegram लोकसत्ता आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@Loksatta) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.

मराठीतील सर्व पुणे बातम्या वाचा. मराठी ताज्या बातम्या (Latest Marathi News) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App. ताज्या बातम्या (latest News) फेसबुक , ट्विटरवरही वाचता येतील.

Web Title: Hsc exam internal evaluation twelfth result by the state government akp

Next Story
VIDEO: अस्वच्छ खोली १५ मिनिटांत चकाचक