scorecardresearch

नाना पेठेत मंडप साहित्याच्या गोदामास भीषण आग

नाना पेठेत क्वार्टर गेट चौक परिसरात मंडप साहित्याच्या गोदमास आग लागल्याची घटना मध्यरात्री बाराच्या सुमारास घडली.

नाना पेठेत क्वार्टर गेट चौक परिसरात मंडप साहित्याच्या गोदमास आग लागल्याची घटना मध्यरात्री बाराच्या सुमारास घडली. आगीत मंडप साहित्य जळून भस्मसात झाले. या घटनेची माहिती मिळताच अग्निशमन दलाचे सहा बंब घटनास्थळी दाखल झाले. बांबू, पडदे, सजावट साहित्याने पेट घेतल्याने आग भडकली. जवानांनी पाण्याचा मारा करून आग आटोक्यात आणण्यासाठी प्रयत्न केले. अर्ध्या तासात आग आटोक्यात आली.
या आगीत चार जण जखमी झाल्याची  प्राथमिक माहिती समोर आली आहे.

मराठीतील सर्व पुणे ( Pune ) बातम्या वाचा. मराठी ताज्या बातम्या (Latest Marathi News) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.

Web Title: Huge fire broke out in the warehouse of mandap in nana peth pune print news zws

ताज्या बातम्या