scorecardresearch

पिंपरी : अगरबत्तीच्या कंपनीला भीषण आग; घटनास्थळाच्या बाजूला असलेल्या शाळेतील २०० विद्यार्थ्यांचे सुरक्षित ठिकाणी स्थलांतर

आग लागलेल्या संबंधित कंपनीत आग लागली तेव्हा काही कामगार कामावर उपस्थित होते.

पिंपरी : अगरबत्तीच्या कंपनीला भीषण आग; घटनास्थळाच्या बाजूला असलेल्या शाळेतील २०० विद्यार्थ्यांचे सुरक्षित ठिकाणी स्थलांतर

आगीचे कारण स्पष्ट नाही, आगीवर नियंत्रण मिळवण्याचे प्रयत्न सुरु

पिंपरी-चिंचवड शहरातील आकुर्डी येथे रॉयल फ्रेग्णसेस प्रा. ली अगरबत्ती बनविणारी कंपनीला सकाळी साडेदहा च्या सुमारास भीषण आग लागल्याची घटना घडली आहे. दरम्यान कंपनीच्या शेजारीच असलेल्या बिना इंग्लिश मीडियम स्कूलमधील विद्यार्थ्यांना खबरदारीचा उपाय म्हणून शाळेतून बाहेर काढत सुरक्षित ठिकाणी स्थलांतर करण्यात आलं आहे.

शाळा सुरु असतांना शाळेत २०० पेक्षा जास्त विद्यार्थी  असल्याची माहिती निगडी पोलीसांनी दिली आहे. तीन तासानंतरही ही आग आटोक्यात आली नाही. अग्निशमन दलाचे जवान आगीवर नियंत्रण मिळवण्याचा प्रयत्न करत आहेत. कंपनीला लागलेल्या या आगीचे नेमके कारण समजू शकलं नाही.  आग लागलेल्या संबंधित कंपनीत आग लागली तेव्हा काही कामगार कामावर उपस्थित होते. सुदैवाने ते यामधून बचावले असून ते सुखरूप बाहेर पडले असल्याचे पोलीसांनी सांगितले. या आगीत कंपनीचे मोठं नुकसान झालं आहे.

मराठीतील सर्व पुणे ( Pune ) बातम्या वाचा. मराठी ताज्या बातम्या (Latest Marathi News) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.

First published on: 06-12-2022 at 13:56 IST

संबंधित बातम्या