scorecardresearch

पिंपरी-चिंचवडमध्ये ऑइल ने भरलेल्या ड्रम च्या गोडाऊन ला भीषण आग; २० ते २२ टँकर ने आग विझवण्याचे शर्थीचे प्रयत्न

पिंपरी-चिंचवडमधील मोशी येथे ऑइल ने भरलेल्या ड्रम च्या गोडाऊन ला भीषण आग लागली आहे. संध्याकाळी नऊ च्या सुमारास आग लागल्याची घटना घडली.

पुणे: पिंपरी-चिंचवडमधील मोशी येथे ऑइल ने भरलेल्या ड्रम च्या गोडाऊन ला भीषण आग लागली आहे. संध्याकाळी नऊ च्या सुमारास आग लागल्याची घटना घडली. अग्निशमन विभाग आणि खासगी कंपनीचे टँकर असे एकूण २० ते २२ टँकरने आग विझवण्याचे शर्तीचे प्रयत्न सुरू आहेत. अद्याप जीविहितहानी झाल्याचं माहिती समोर आलेली नाही.
मिळालेल्या माहितीनुसार, मोशी येथील डिमार्ट परिसरात असणाऱ्या गोडाऊन ला भीषण आग लागली. ही घटना नऊ च्या सुमारास घडली आहे. गोडाऊनमध्ये ऑईलन ने भरलेले ड्रम असून त्यामुळं आग भडकत असल्याची माहिती अग्निशमन दलाचे मुख्याधिकारी किरण गावडे यांनी दिली आहे. धुरांचे लोट काही किलोमीटर अंतरावरून दिसत होते. तसेच ऑइल ने भरलेल्या ड्रम चा स्फोट झाल्याचं नागरिकांनी सांगितलं आहे. आग आटोक्यात आणण्याचे शर्थीचे प्रयत्न रात्री उशिरा पर्यंत सुरू होते. मात्र आग ऑइलमुळे धुमसत आहे. अद्याप हे गोडाऊन कोणाचे आहे? आणि नाव काय आहे हे समजू शकेल नाही अशी माहिती अग्निशमन विभागाने दिलीय.

मराठीतील सर्व पुणे ( Pune ) बातम्या वाचा. मराठी ताज्या बातम्या (Latest Marathi News) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.

Web Title: Huge fire oil filled drum godown pimpri chinchwad 20 22 tankers extinguish fire department amy