पुणे : नैर्ऋत्य मोसमी वाऱ्यांचे आगमन काही दिवसांवर येऊन ठेपले असतानाच दक्षिण-पूर्व अरबी समुद्रात कमी दाबाचे क्षेत्र निर्माण होऊन चक्रीवादळ घोंघावण्याचे संकेत आहेत. मात्र, या चक्रीवादळामुळे नैर्ऋत्य मोसमी वारे सक्रिय होण्यास मदतच होणार आहे. हे चक्रीवादळ ओमानकडे सरकणार असल्याने महाराष्ट्रासह पश्चिम किनारपट्टीला धोका नसला, तरी महाराष्ट्रासह गोवा, के रळ, कर्नाटकात पावसाची शक्यता हवामान विभागाने वर्तवली आहे.