Premium

पिंपरी: चार महिन्यांपूर्वी झालेला बालविवाह उघडकीस; पती अटकेत

याप्रकरणी अल्पवयीन विवाहितेने पिंपरी पोलीस ठाण्यात फिर्याद दिली आहे.

husband arrested case child marriage pimpri
पिंपरी: चार महिन्यांपूर्वी झालेला बालविवाह उघडकीस; पती अटकेत (फोटो सौजन्य- प्रातिनिधिक छायाचित्र)

लोकसत्ता प्रतिनिधी

या बातमीसह सर्व प्रीमियम कंटेंट वाचण्यासाठी साइन-इन करा

पिंपरी: चार महिन्यांपूर्वी झालेला बालविवाह उघडकीस आला असून पतीला पिंपरी पोलिसांनी अटक केली. तसेच बालविवाह प्रतिबंध कायद्यानुसार १४ जणांविरोधात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

याप्रकरणी अल्पवयीन विवाहितेने पिंपरी पोलीस ठाण्यात फिर्याद दिली आहे. त्यानुसार पती रोहित सुरज भोसले (वय २२ रा.पिंपरीगाव) याला अटक केली. रोहन राजेंद्र कांबळे (वय २२), लालसो कांबळे (वय ७०), तुषार गायकवाड (वय २२), प्रेम उर्फ राहुल सुरज भोसले (वय १७), शिवाजी साळवे (वय ४५) यांच्यासह सात महिला आणि रोहितच्या तीन मावस भाऊ यांच्यावर बालविवाह प्रतिबंधक कायद्यानुसार गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

हेही वाचा… ‘शिरूर’ मध्ये अनेक इच्छुक…अजित पवार म्हणाले, ‘मग बिघडले कुठे?’

फिर्यादी या अल्पवयीन आहेत. त्या अल्पयवयीन असताना आरोपींनी संगनमत करुन रोहित याच्याशी त्यांचा चार महिन्यापूर्वी विवाह लावून दिला. रोहितने बळजबरीने शारीरिक संबंध ठेवले. शिवीगाळ करत हाताने मारहाण केली. या विवाहाला फिर्यादीच्या आईचा पूर्वीपासून विरोध होता. अखेरीस चार महिन्यानंतर आईने मुलीसह पोलीस ठाण्यात धाव घेतली. पिंपरी ठाण्याचे सहाय्यक पोलीस निरीक्षक डॉ. अशोक डोंगरे तपास करत आहेत.

Pune News (पुणे न्यूज), Maharashtra News, Marathi News (मराठीतील बातम्या) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.

Web Title: Husband arrested in the case of child marriage in pimpri pune print news ggy 03 dvr

First published on: 02-06-2023 at 13:49 IST
Next Story
‘शिरूर’ मध्ये अनेक इच्छुक…अजित पवार म्हणाले, ‘मग बिघडले कुठे?’