नाश्ता न दिल्याने चिडलेल्या पतीने ६३ वर्षीय पत्नीला ढकलून दिले. या घटनेत ज्येष्ठ महिलेच्या खुब्यास गंभीर दुखापत झाली आहे. याबाबत पत्नीने चतु:शृंगी पोलीस ठाण्यात फिर्याद दिली आहे. त्यानुसार ६५ वर्षीय पती विरोधात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. महिलेच्या खुब्यावर शस्त्रक्रिया करण्यात आल्याची माहिती पोलिसांनी दिली.

शिवीगाळ करत जीवे मारण्याची धमकी

What Bacchu Kadu Said?
अमरावतीतल्या मैदान राड्यानंतर बच्चू कडूंची पहिली प्रतिक्रिया, म्हणाले, “मला अटक व्हावी म्हणून राणा दाम्पत्याने…”
salman khan reaction on shahrukh khan song
Video: घरावरील हल्ल्यानंतर सलमान खान दुबईत, शाहरुख खानचं गाणं वाजताच भाईजानने दिली ‘अशी’ प्रतिक्रिया
father beaten
वसई : मुलीचे अपहरण केल्यानंतर पित्याला बेदम मारहाण, नया नगर पोलीस ठाण्यात दोघांविरोधात गुन्हा
Hardik Pandya Reacts To Defeat
IPL 2024 : हैदराबादकडून पराभूत झाल्यानंतर हार्दिक पंड्याने दिली प्रतिक्रिया, सांगितले मुंबईच्या पराभवाचे सर्वात मोठे कारण

ज्येष्ठ दाम्पत्य भोसलेनगर परिसरात राहायला आहे. त्यांच्याबरोबर मुलगा आणि सूनही राहायला आहे. वयोमानानुसार फिर्यादी महिलेला फारसे काम होत नाही. ज्येष्ठ महिलेने सकाळी पतीला नाश्ता दिला. मात्र, नाश्ता पुरेसा न दिल्याने पती महिलेवर चिडले. त्यांना शिवीगाळ करुन ढकलून दिले. त्यांना जीवे मारण्याची धमकी दिली. फरशीवर पडल्याने त्यांच्या डाव्या पायाच्या खुब्यास दुखापत झाली.

खुब्यावर शस्त्रक्रिया

मुलगा आणि सुनेने त्यांना तातडीने खासगी रुग्णालयात दाखल केले. महिलेच्या खुब्यावर शस्त्रक्रिया करण्यात आली. मुलगा आणि सुनेशी चर्चा केल्यानंतर महिलेने पोलिसांकडे तक्रार दिली. पोलीस उपनिरीक्षक भालेराव या प्रकरणाचा तपास करत आहेत.