पिंपरीत १४ वर्षीय मुलासमोरच पतीने केला पत्नीचा खून

परीत पतीने पत्नीच्या डोक्यात पाटा घालून खून केल्याची घटना आज पहाटेच्या सुमारास घडली आहे.

murder
प्रातिनिधिक छायाचित्र

पिंपरीत पतीने पत्नीच्या डोक्यात पाटा घालून खून केल्याची घटना आज पहाटेच्या सुमारास घडली आहे. घटनेनंतर आरोपी पती हा स्वतः पिंपरी पोलीस ठाण्यात हजर झाला. साहेब मी पत्नीचा खून केला आहे अस म्हणत स्वतः समर्पण केलं आहे. जेनब अजमुद्दीन चाकोरे अस खून झालेल्या महिलेचे नाव असून अजमुद्दीन अलाहुद्दीन चाकोरे अस आरोपी पतीचे नाव आहे. 

पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, चाकोरे कुटुंब हे मूळ उस्मानाबाद जिल्ह्यातील आहे. आरोपी अजमुद्दीन याला एक मुलगा आणि मुलगी आहे. काही कारणांमुळे मुलगी काही दिवसांपासून बालसुधारगृहात आहे. तिच्यावरून पती अजमुद्दिन आणि मयत पत्नी जेनब यांच्यात वाद सुरू होते. मुलीवरून दोघांमध्ये दररोज भांडण होत असत.

दरम्यान, आज पहाटेच्या सुमारास चौदा वर्षीय मुलाच्या समोरच अजमुद्दीन याने पत्नीच्या डोक्यात पाटा घालून खून केला आहे. घटनेनंतर स्वतः तो पिंपरी पोलीस ठाण्यात हजर झाला. गुन्ह्याची कबुली देत पत्नीचा खून केला असल्याच त्याने पोलिसांना सांगितले. पिंपरी पोलिसांनी खात्री करून घटनास्थळी धाव घेत घटनेची माहिती घेतली. घटनेचा अधिक तपास पिंपरी पोलीस करत आहेत. 

Loksatta Telegram लोकसत्ता आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@Loksatta) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.

मराठीतील सर्व पुणे बातम्या वाचा. मराठी ताज्या बातम्या (Latest Marathi News) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App. ताज्या बातम्या (latest News) फेसबुक , ट्विटरवरही वाचता येतील.

Web Title: Husband kills wife in front of 14 year old boy in pimpri kjp 91 srk

Next Story
आमदारांना पुढे करून मुख्यमंत्र्यांच्या ‘त्या’ निर्णयांचे राष्ट्रवादीने श्रेय घेतले
ताज्या बातम्या