“चिंचवड पोटनिवडणूक लढवण्यावर मी ठाम आहे”, अशी प्रतिक्रिया ठाकरे गटाचे बंडखोर नेते आणि अपक्ष उमेदवार राहुल कलाटे यांनी दिली. ठाकरे गटाचे नेते सचिन अहिर हे राहुल कलाटे यांची भेट घेणार आहेत. उद्या उमेदवारी अर्ज मागे घेण्याचा शेवटचा दिवस असल्याने अनेक राजकीय घडामोडी चिंचवड मतदारसंघात घडण्याची शक्यता आहे. जनभावनेचा अनादर मी करणार नाही, असे अपक्ष उमेदवार राहुल कलाटे यांनी स्पष्ट केले आहे. 

महाविकास आघाडीचे नाना उर्फ विठ्ठल काटे हे अधिकृत उमेदवार असून, बंडखोर राहुल कलाटे यांनी अपक्ष उमेदवारी अर्ज दाखल केल्याने महाविकास आघाडीची डोकेदुखी वाढली आहे. महाविकास आघाडीकडून राहुल कलाटे यांची मनधरणी करण्याचा प्रयत्न सुरू आहे, असे असताना राहुल कलाटे हे मात्र निवडणूक लढवण्यावर ठाम आहेत. 

Shashikant Shinde, dhule lok sabha,
माझ्यासमोर उमेदवार कोण हेच माहित नाही – शशिकांत शिंदे
Sudhir Mungantiwar reacts on social media trolling about controversial statement against congress
“काँग्रेसविरोधात मी असाच बोलत राहणार,” सोशल मीडियावरील ट्रोलिंगला सुधीर मुनगंटीवार यांचे प्रत्युत्तर; म्हणाले, “भाषणाचा अर्धवट व्हिडिओ…”
Election Commission ,Lok Sabha election
लोकजागर: अमर्याद खर्चाची ‘मर्यादा’!
jalna, lok sabha election 2024, Congress
जालन्यात काँग्रेसचा सावध पवित्रा

हेही वाचा – “चिंचवड पोटनिवडणुकीत यश आलेच पाहिजे”, अजित पवारांनी पदाधिकाऱ्यांना ठणकावले; म्हणाले, “महाविकास आघाडी..”

हेही वाचा – “तुमचा पराभव निश्चित समजा, कारण..” पोटनिवडणुकीवरून वसंत मोरेंचे शिंदे-फडणवीस सरकारला आव्हान

राहुल कलाटे म्हणाले की, मी २०१९ ला चिंचवड विधानसभा लढलेलो आहे. तेव्हा अपक्ष निवडणूक लढवण्याचा कोणी विचार केला नाही. दिवंगत लक्ष्मण जगताप यांच्या समोर मी लढलो. त्यावेळी नागरिकांनी भरभरून प्रेम दिले. पुढे ते म्हणाले की, राष्ट्रवादीने चिंचवड विधानसभा पोटनिवडणूक बिनविरोध दिल्यास मीही विचार करेल. काही दिवसांपूर्वी बिनविरोध पोटनिवडणूक होईल, असे वाटत होते. तेव्हा ‘मी वेट अँड वॉच’च्या भूमिकेत होतो. परंतु, निवडणूक लढवण्यास महाविकास आघाडी पुढे आल्यानंतर मी निवडणूक लढवण्याचे ठरवले. पुढे ते म्हणाले की, सचिन अहिर हे उद्या भेटणार आहेत. बहुदा त्यांना उद्धव ठाकरे यांनी सांगितले असावे, असे त्यांनी सांगितले आहे.