प्रधानमंत्री किसान सन्मान निधी योजनेंतर्गत अद्याप जिल्ह्यातील एक लाख ५९ हजार ८६३ लाभार्थ्यांची ग्राहक ओळख पडताळणी प्रक्रिया (ई-केवायसी) प्रलंबित आहे. संकेतस्थळावरील नोंदणीकृत पात्र लाभार्थ्यांना ई-केवायसी करण्यासाठी ७ सप्टेंबरपर्यंत मुदतवाढ देण्यात आली असून या मुदतीत प्रमाणीकरण करुन घ्यावे, असे आवाहन जिल्हाधिकारी डॉ. राजेश देशमुख यांनी केले आहे.

हेही वाचा >>> पुणे : साडेतीन लाख पुणेकरांनी जोडले मतदार यादीला आधार

eknath shinde
आरोग्य विभागातील १४४६ वैद्यकीय अधिकाऱ्यांची भरती प्रक्रिया पूर्ण, मुख्यमंत्र्यांच्या हस्ते पदस्थापनेचा आदेश!
treatment in private hospitals
गरीब रुग्णांना खासगी, धर्मदाय रुग्णालयात उपचार मिळणार, राज्यस्तरीय विशेष मदत कक्ष कार्यान्वित
people from Ichalkaranji will show black flags to cm eknath shinde and Minister suresh Khade for Sulkood water issue
सुळकुड पाणी प्रश्नासाठी मुख्यमंत्री आणि मंत्री खाडे यांना रविवारी इचलकरंजीत काळे झेंडे दाखवणार
electricity
कंत्राटी कर्मचारी संपावर गेल्याने राज्यातील वीज यंत्रणा सलाईनवर.. ‘या’ आहेत मागण्या…

प्रधानमंत्री किसान सन्मान निधी योजनेंतर्गत पात्र लाभार्थ्याना ई-केवायसी करण्यासाठी ओटीपी किंवा बायोमेट्रीक हे पर्याय उपलब्ध करुन दिले आहेत. योजनेच्या लाभासाठी सर्व पात्र शेतकऱ्यांनी वेळेत ई-केवायसी करणे बंधनकारक आहे. जिल्ह्यात आतापर्यंत एकूण चार लाख ९८ हजार २७८ शेतकऱ्यांपैकी तीन लाख ३८ हजार ४१५ शेतकऱ्यांचे ई-केवायसी प्रमाणीकरण पूर्ण करण्यात आले आहे. उर्वरीत एक लाख ५९ हजार ८६३ लाभार्थ्यांचे ई-केवायसी प्रमाणीकरण प्रलंबित आहे, अशी माहिती जिल्हा प्रशासनाने दिली.