पिंपरी: भाजपा आणि RSS ची विचार सरणी ही महिलांच्या विरोधातील आहे. भाजपाकडून महिलांचा वारंवार अपमान केला जातो. महिलांबद्दल खालच्या पातळीवर जाऊन बोललं जातं. महिलांकडे आता वस्तू म्हणून पाहिलं जात आहे. हे आधी कधीच घडलेले नाही. हा देश पुरोगामी, साधू, संतांच्या विचारांचा आहे. परंतु, भाजपा मात्र महिलांचा नेहमी अपमान करत आहे. त्यांना वरिष्ठ नेते पाठीशी घालतायत असा आरोप काँग्रेसच्या नेत्या आमदार प्रणिती शिंदेंनी भाजपावर केला आहे. भाजपा हा आमचा एकमेव शत्रू आहे. महाराष्ट्रात दबावाचे सरकार आहे लोकशाहीचे नाही. असा टोला देखील त्यांनी लगावला आहे. त्या पिंपरी- चिंचवडमध्ये पत्रकार परिषदेत बोलत होत्या. यावेळी काँग्रेस शहराध्यक्ष कैलास कदम यांच्यासह इतर पदाधिकारी उपस्थित होते.

प्रणिती शिंदे म्हणाल्या की, वातावरण विरोधात होत चालले की हे कांड करतात. ठिकठिकाणी पेटवापेटवीचं राजकारण आणि जातीयवाद पसरवतात. निवडणूक कशी जिंकायची याकडे ते बघत असतात. पुढे त्या म्हणाल्या की, काँग्रेस, राहुल गांधी आणि आम्हाला सावरकर यांची विचारसरणी पटत नाही. प्रत्येक पक्षाची एक विचारासरणी असते. एकेकाळी RSS आणि भाजपाला महात्मा गांधींची विचारसरणी पटत नव्हती. छत्रपती शिवाजी महाराज हे आपले आराध्य दैवत आहे पण त्यांच्या विरोधात सावरकर यांनी लिहिले हे इतिहासात पाहायला मिळतं.

tejasvi surya marathi news, tejasvi surya nagpur marathi news
“मोदींमुळे बेरोजगार झालेल्या काँग्रेस नेत्यांकडूनच बेरोजगारीवर बोंबाबोंब”, तेजस्वी सूर्या म्हणाले…
Kamal Nath
“…तर मी काँग्रेसमधून बाहेर पडेन”, कमलनाथांनी कार्यकर्त्यांसमोर स्पष्ट केली भूमिका
ajit pawar budget speech
अजित पवारांनी कुसुमाग्रजांच्या ‘या’ कवितेच्या ओळी म्हणताच सभागृहात हशा; म्हणाले, “विरोधकांनी प्रतिक्रियांचा पुनर्विचार करावा!”
Case against Congress workers for burning effigy of Prime Minister
पुणे : पंतप्रधानांचा पुतळा जाळल्याप्रकरणी काँग्रेस कार्यकर्त्यांविरुद्ध गुन्हा

आणखी वाचा- “महागाई, बेरोजगारीवरून लक्ष विचलित करण्यासाठी सत्ताधाऱ्यांकडून सावरकर गौरव यात्रा”, अजित पवार यांचा आरोप

पुढे त्या म्हणाल्या की, काँग्रेस ची केंद्रात सत्ता होती तेव्हा ईडी, सीबीआय यांच्यावर दबाव टाकला नाही. पण सध्या आपण महाराष्ट्रात देशात काय चालल आहे ते पाहत आहोत. भारत जोडी यात्रा ही राजकीय हेतूने काढली नाही. आम्ही सत्तेसाठी नव्हे तर हुकूमशाही, आणि दाबावाच्या राजकारणाविरोधात लढतो आहोत. आम्हाला लोकशाही जिवंत ठेवायची आहे. काँग्रेसने पहिली महिला पंतप्रधान या देशाला दिली. आगामी काळात महाराष्ट्रात देखील पहिली महिला मुख्यमंत्री दिलेली तुम्ही पाहाल असं देखील त्या म्हणाल्या आहेत.