शरीरसौष्ठवासाठी वापरल्या जाणाऱ्या इंजेक्शनची बेकायदा विक्री केल्या प्रकरणी गुन्हे शाखा आणि अन्न आणि औषध प्रशासनाने (एफडीए) एकाच्या विरोधात गुन्हा दाखल केला. शंकरशेठ रस्त्यावर ही कारवाई करण्यात आली. या कारवाईत पावणेदोन लाख रुपयांची इंजेक्शन जप्त करण्यात आली.

हेही वाचा- टोळक्याकडून लाथाबुक्क्यांनी बेदम मारहाण करत एकाचा खून; पुण्यातील नर्‍हे भागातील घटना

या प्रकरणी अमृत पंडीत चौधरी (वय ३०, रा. केशवनगर, मुंढवा) याच्या विरोधात स्वारगेट पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. याबाबत एफडीएच्या ओैषध निरीक्षक शामल महिंद्रकर यांनी स्वारगेट पोलीस ठाण्यात फिर्याद दिली आहे. शरीरसौष्ठवपटू डॅाक्टरांच्या सल्ल्याने या इंजेक्शनचा वापर करतात. चौधरी या इंजेक्शनची बेकायदा विक्री करत असल्याची माहिती गुन्हे शाखेच्या युनिट दोनला मिळाली. त्यानंतर पोलिसांनी सापळा लावून चौधरीला ताब्यात घेतले. त्याच्याकडून एक लाख ७० हजार ३०५ रुपयांची इंजेक्शन जप्त करण्यात आली.

हेही वाचा- शाळकरी मुलाचा लैगिंक छळ; माजी मुख्याध्यापकासह तिघांवर गुन्हा दाखल

पोलीस उपायुक्त श्रीनिवास घाडगे, सहायक आयुक्त गजानन टोम्पे यांच्या मार्गदर्शनाखाली वरिष्ठ पोलीस निरीक्षक क्रांतीकुमार पाटील, सहायक निरीक्षक विशाल मोहिते, नामदेव रेणुसे, मोकाशी, पवार, राजपुरे, ताम्हाणे, शेख, जाधव, नागनाथ राख आदींनी ही कारवाई केली.