अश्विनी जगताप, शंकर जगताप समर्थकांकडून इमेज वॉर!; सोशल मीडियावर फोटो व्हायरल | Image War by Ashwini Jagtap Shankar Jagtap Supporters Photo viral on social media kjp 91 ysh 95 | Loksatta

अश्विनी जगताप, शंकर जगताप समर्थकांकडून इमेज वॉर!; सोशल मीडियावर फोटो व्हायरल

जगताप कुटुंबातील दोघांनी उमेदवारी अर्ज आणला आहे

shankar jagtap ashwini jagtap
(फोटो-लोकसत्ता ग्राफिक्स टीम)

चिंचवड विधानसभा पोटनिवडणूकीत नाट्यमय घडामोडी घडत असताना जगताप कुटुंबातील दोन्ही समर्थकाकांकडून इमेज वॉर पाहायला मिळत आहे. दिवंगत आमदार लक्ष्मण जगताप यांच्या पत्नी अश्विनी जगताप आणि आमदारांचे बंधू शंकर जगताप यांनी उमेदवारी अर्ज आणल्यानंतर दोन्ही समर्थकांनी आपापल्या इच्छुक उमेदवाराचे फोटो व्हायरल करून प्रचार करत आहेत. दिवंगत आमदार लक्ष्मण जगतापांच्या पत्नी आणि भावाच्या समर्थकांकडून सोशल मीडियावर प्रचार सुरू झाला आहे.

हेही वाचा >>> ‘अश्विनी जगताप’ की ‘शंकर जगताप’? लक्ष्मण जगतापांच्या पत्नी पाठोपाठ बंधू शंकर जगतापांनी घेतला उमेदवारी अर्ज

काल दोघांनी अर्ज घेतले तर आज अश्विनी जगताप आणि शंकर जगताप समर्थकांनी सोशल मीडियावर प्रचाराचे रणशिंग फुंकले आहे. अश्विनी जगताप समर्थकांकडून फिरवल्या जाणाऱ्या इमेजवर आणि व्हॉट्सअॅप स्टेट्सवर “आदेश पक्षाचा, निर्धार जनतेचा” असा आशय आणि त्यावर फक्त दिवंगत लक्ष्मण जगताप आणि अश्विनी जगतापांचा फोटो असून भाजपाचे चिन्हही आहे. तर शंकर जगताप समर्थकांकडून फिरवल्या जाणाऱ्या इमेजवर, “एक ही कार्यकर्ता ‘लक्ष्मण’ रेषा ओलांडणार नाही. आमदार शंकरशेठ झाल्याशिवाय स्वस्त बसणार नाही. आमदार जगतापच.” असा आशय आणि त्यावर दिवंगत लक्ष्मण जगताप आणि शंकर जगतापांसह भाजपाचे चिन्ह आहे. सोशल मीडियावर समर्थकांकडून हे वॉर सुरू झाल्याने जगताप कुटुंबातील वादाला आणखी फोडणी मिळण्याची शक्यता आहे.

मराठीतील सर्व पुणे ( Pune ) बातम्या वाचा. मराठी ताज्या बातम्या (Latest Marathi News) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.

First published on: 03-02-2023 at 11:06 IST
Next Story
महसूल कर भरा आता ऑनलाइन ; पुणे जिल्ह्यातील ३१४ गावांची निवड