शाश्वत भविष्यासाठी लिंग समानता ही यंदाच्या जागतिक महिला दिनाची मध्यवर्ती संकल्पना आहे. शेती, प्रशासन, कला-क्रीडा, राजकारण असे एकही क्षेत्र नाही, की जिथे महिला आपले कार्यकर्तृत्व सिद्ध करत नाहीत. महिला दिनाच्या निमित्ताने वेगळी वाट चोखाळणाऱ्या काही महिलांचा परिचय..

महिलांमुळे प्रशासनातही सकारात्मकता

article about upsc exam preparation guidance upsc exam preparation tips in marathi
UPSC ची तयारी : भारतीय राज्यव्यवस्था – मूलभूत हक्क, मार्गदर्शक तत्त्वे आणि मूलभूत कर्तव्ये
Inheritance of girls and women Two main types of property ownership
मुली आणि महिलांचा वारसाहक्क
1 in every 10 women in the world lives in extreme poverty
प्रत्येकी १० पैकी एका महिलेचं आयुष्य अत्यंत गरिबीत, युएन वुमेनच्या अहवालातून धक्कादायक माहिती समोर
Why are we 50 years behind the world in the field of irrigation
आपण सिंचन क्षेत्रातच तेवढे जगाच्या ५० वर्षे मागे का?

आई गृहिणी, तर वडील शासकीय सेवेत असल्याने सतत बदली व्हायची. शालेय शिक्षण विविध ठिकाणी झाले. मोठी बहीण स्पर्धा परीक्षा देत असल्याने त्याच क्षेत्रात पदवीनंतर पहिल्याच प्रयत्नात राज्य सेवा परीक्षा उत्तीर्ण होऊन सुप्रिया करमरकर-दातार प्रशासनात दाखल झाल्या. सध्या त्या पर्यटन संचालनालय पुणे विभागाच्या उपसंचालक म्हणून कार्यरत आहेत.

वडील शासकीय सेवेत असल्याने सतत बदली व्हायची. त्यामुळे करमरकर यांचे शालेय शिक्षण दहिवडी, इंदापूर अशा विविध ठिकाणी झाले. बारामतीमधील टी. सी. कॉलेजमधून वाणिज्य शाखेची पदवी घेतली. पदवीधर झाल्यानंतर मोठी बहीण स्पर्धा परीक्षा देत असल्याने त्यांनीही प्रशासनात जायचे ठरविले. दोन वर्षे स्पर्धा परीक्षेची तयारी करतानाच पुण्यात वाणिज्य शाखेची पदव्युत्तर पदवी त्यांनी घेतली आणि पहिल्याच प्रयत्नात राज्य सेवा परीक्षा उत्तीर्ण होऊन सन २००२ मध्ये प्रशासकीय सेवेत करमरकर दाखल झाल्या.

रायगड जिल्ह्यातील माणगाव, उरण येथे तहसीलदार, पुणे विभागात जलसंपदा विभागात काम केल्यानंतर करमरकर यांना बढती मिळून त्या उपजिल्हाधिकारी म्हणून नांदेड येथे रुजू झाल्या. त्यानंतर पुण्यातील नोंदणी व मुद्रांक शुल्क विभागाच्या मुख्यालयात उपमहानिरीक्षक (संगणक) म्हणून कार्यभार सांभाळला. सव्‍‌र्हर डाउन होत असल्याने सातत्याने दस्त नोंदणीत अडथळे येत होते. त्यामुळे नोंदणी व मुद्रांक शुल्क विभाग केंद्रीय साठवणूक प्रणालीवर (क्लाउड सिस्टीम) नेण्याचा निर्णय झाला. हा विभाग क्लाउडवर नेण्यात करमरकर यांचा सिंहाचा वाटा आहे. त्यामुळे दस्त नोंदणीतील अडथळे जवळजवळ बंदच झाले आहेत. तसेच रायगड जिल्ह्यात तहसीलदार म्हणून काम करताना विक्रमी महसूल गोळा केल्याबद्दल त्यांना पुरस्कारही प्राप्त झाला आहे.

प्रशासनात अधिकारी म्हणून काम करताना पुरुष-महिला अधिकारी असा भेद नसतो. मात्र, महिलांमध्ये एखादा प्रश्न सोडविण्यासाठी त्याला विविध अंगाने पाहण्याची नैसर्गिक देणगी असते आणि महिला अधिकारी प्रशासनात किंवा अन्य क्षेत्रातही मोठय़ा पदावर काम करताना वेगळी दृष्टी ठेवून काम करतात. त्यामुळे अधिकाधिक महिला प्रशासनात आल्यास निश्चितपणे प्रशासनात सकारात्मक बदल घडतील, असा विश्वास करमरकर यांनी व्यक्त केला.

वसा पर्यावरणाचा

बँकेत नोकरी, आवड म्हणून अभिनय अशी व्यवधाने असली तरी पर्यावरणाच्या प्रश्नांबाबत असलेल्या जिव्हाळय़ातून डॉ. विनिता आपटे यांनी तेर (टेक्नॉलॉजी, एज्युकेशन, रिसर्च, रिहॅबिलिटेशन फॉर द एन्व्हॉयर्नमेंट) या स्वयंसेवी संस्थेची स्थापना केली. पॅरिसमध्ये युनायटेड नेशन्स एनव्हॉयर्नमेंटमध्ये काम करण्याची संधी मिळाल्यानंतरही ते काम पूर्ण झाल्यानंतर भारतात येऊन पर्यावरण क्षेत्रात त्यांनी आपले काम सुरू ठेवले.

निसर्गाच्या संरक्षण आणि संवर्धनासाठी केवळ झाडे लावणे पुरेसे नाही तर त्यांचे जतन तेवढेच आवश्यक आहे, या जाणिवेतून त्यांनी कामाला सुरुवात केली. वारजे परिसरातील एका टेकडीवर झाडे लावणे आणि जगवणे या कामात त्या सातत्याने योगदान देत आहेत. टाटा मोटर्स, पर्सिस्टंट या कंपन्यांनी या प्रकल्पामध्ये सहभाग घेतला आहे. डॉ. विनिता आपटे सांगतात,‘तेर पॉलिसी सेंटरतर्फे शालेय मुलांसाठी तेर पर्यावरण प्रशिक्षण ऑलिम्पियाड या स्पर्धेचे आयोजन करण्यात येते. यामध्ये तीन ते चार लाख मुले सहभागी होतात. डॉ. अब्दुल कलाम पाठय़वृत्ती प्रकल्पाद्वारे १८-२५ वर्ष वयोगटातील मुलांना रोख पारितोषिके दिली जातात.  पर्यावरणाबाबत आस्था असलेल्यांची संख्या लक्षणीय आहे, मात्र त्याला प्रत्यक्ष कृतीची जोड देणाऱ्यांची संख्या कमी होत आहे. हे चित्र बदलण्यासाठी २००५ मध्ये जागतिक स्तरावरील पर्यावरण विषयक प्रकाशने भारतात आणली. झाडे, त्यांचे अधिवास यांबाबत भरपूर माहिती मुलांपर्यंत पोहोचवण्याचा प्रयत्न आहे.