scorecardresearch

२०२४ मध्ये चिंचवडला राष्ट्रवादीचाच आमदार; आभार मेळाव्यात कार्यकर्त्यांचा निर्धार

२०२४ मध्ये चिंचवड विधानसभेचा आमदार हा राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचाच होईल असा निर्धार महाविकास आघाडीच्या कार्यकर्त्यांनी केला

ncp melava
(फोटो सौजन्य- लोकसत्ता टीम)

पुणे: नुकत्याच झालेल्या चिंचवड विधानसभेच्या पोटनिवडणूकीनंतर काल महाविकास आघाडीच्या वतीने आभार मेळाव्याचे आयोजन करण्यात आले. यावेळी येणाऱ्या २०२४ च्या विधानसभा निवडणुकीत चिंचवड विधानसभेचा आमदार हा राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचाच होईल असा निर्धार महाविकास आघाडीच्या कार्यकर्त्यांनी केला. महाविकास आघाडीच्या पाठीशी भक्कमपणे उभा राहिलेल्या जनतेचे आभार व्यक्त करण्यासाठी महाविकास आघाडीच्या वतीने थेरगाव येथे काल आभार मेळाव्याचे आयोजन करण्यात आले होते.

चिंचवड विधानसभेच्या पोटनिवडणुकीमध्ये महाविकास आघाडीच्या पाठीशी मतदारसंघातील नागरिकांनी, मतदारांनी मोठी ताकद उभी केली होती. जनतेने महाविकास आघाडीच्या उमेदवाराप्रती दाखविलेल्या विश्वासास आम्ही कधीही तडा जावू देणार नाही, जनतेने दाखविलेला विश्वासाबद्दल आम्ही त्यांचे नक्कीच ऋणी राहू, मात्र जनतेचे आभार मानणे हे देखील महाविकास आघाडीचे कर्तव्य आहे. असे मत महाविकास आघाडीच्या नेत्यांनी व उमेदवाराने व्यक्त केले.

आणखी वाचा- बारामती लोकसभा मतदारसंघातील समस्या न सुटल्यास आंदोलन करणार: खासदार सुप्रिया सुळे

या कार्यक्रमाचे प्रास्ताविक राष्ट्रवादी कॉंग्रेसचे प्रवक्ते विनायक रणसुभे यांनी केले. यावेळी नरेंद्र बनसोडे, प्रवीण कदम, अजितभाऊ गव्हाणे, माजी आमदार गौतम चाबुकस्वार, राष्ट्रवादी विद्यार्थी कॉंग्रेस प्रदेशाध्यक्ष सुनिल गव्हाणे, युवक प्रदेश कार्याध्यक्ष रविकांत वर्पे यांनी कार्यकर्त्यांना मार्गदर्शन केले. चिंचवड विधानसभेचे उमेदवार विठ्ठल उर्फ नाना काटे यांनी सर्व उपस्थितांचे व मतदारांचे आभार मानले.

मराठीतील सर्व पुणे ( Pune ) बातम्या वाचा. मराठी ताज्या बातम्या (Latest Marathi News) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.

First published on: 10-03-2023 at 14:15 IST