पुणे / बारामती : संपूर्ण राज्याचे लक्ष लागलेल्या आणि पवार कुटुंबीयांची प्रतिष्ठा पणाला लागलेल्या बारामती मतदारसंघाकडे ज्येष्ठ नेते, माजी केंद्रीय कृषिमंत्री शरद पवार यांनी विशेष लक्ष दिले आहे. बारामतीचा गड राखण्यासाठी शरद पवार यांच्या आज, मंगळवारी (५ नोव्हेंबर) बारामती शहर आणि ग्रामीण भागात एकूण सहा सभा होणार आहेत.

लोकसभा निवडणुकीप्रमाणेच विधानसभेची निवडणूकही शरद पवार आणि अजित पवार यांच्यासाठी प्रतिष्ठेची ठरली आहे. बारामती शहराचे गेली पस्तीस वर्षे प्रतिनिधित्व करणारे राज्याचे उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्यापुढे त्यांचे सख्खे पुतणे, राष्ट्रवादी (शरद पवार) पक्षाचे युवा नेते युगेंद्र पवार यांचे आव्हान असणार आहे. या दोघांनी गेल्या सोमवारी उमेदवारी अर्ज दाखल केल्यानंतर पवार कुटुंबीयांतील भावनिक राजकारणाला सुरुवात झाली होती. ‘घर फोडल्याचा’ आरोप अजित पवार यांनी केल्यानंतर या आरोपाला शरद पवार यांनीही स्पष्ट उत्तर दिले होते. ‘घर फोडण्याचे पाप कधी केले नाही, आणि तशी शिकवणही मला आई-वडील आणि भावांनी दिली नाही,’ असा हल्लाबोल शरद पवार यांनी केला होता. या दरम्यान, दिवाळीनिमित्ताने शरद पवार आणि अजित पवार या दोघांनीही स्वतंत्रपणे नागरिकांच्या भेटी घेतल्या होत्या.

sharad pawar retirement (1)
Video: शरद पवारांचे राजकारणातून निवृत्तीचे संकेत, आता राज्यसभेतही जाणार नाही? भाषणात म्हणाले…
Ladki Bahin Yojna Sudhir Mungantiwar 2100 rs Installment
Ladki Bahin Yojna : लाडक्या बहिणींना २१०० रुपयांसाठी…
CJI Chandrachud
CJI Chandrachud : “सरकारविरोधात निकाल देणं म्हणजे…”, न्यायव्यवस्थेच्या स्वातंत्र्याविषयी सरन्यायाधीशांचं परखड मत
NCP Clock
NCP Clock Symbol : ऐन निवडणुकीत सर्वोच्च न्यायालयाकडून अजित पवारांना आदेश; पक्षचिन्हाबाबत दिला ३६ तासांचा अल्टिमेटम!
Who is Madhurima Raje?
Madhurima Raje : सतेज पाटील ज्यांच्यामुळे ढसाढसा रडले त्या मधुरिमा राजे कोण आहेत?
Sharad Pawar and Yugendra Pawar
Sharad Pawar : ५७ वर्षांचा राजकीय प्रवास, बारामती मतदारसंघ अन् पवार घराणं; युगेंद्र पवारांनी अर्ज भरल्यानंतर शरद पवारांची भावूक प्रतिक्रिया!
Maharashtra Assembly Election 2024 Live Updates in Marathi
Maharashtra Assembly Election 2024 : कोल्हापूर काँग्रेसमध्ये दोन गट? शाहू महाराज – सतेज पाटील यांच्यातील संबंधात कटुता?

हेही वाचा : हडपसर मधील नागरिक ‘ या’ कारणांमुळे त्रस्त !

बारामतीची निवडणूकही प्रतिष्ठेची ठरली असल्याने या निवडणुकीकडे राज्याचे लक्ष लागले आहे. या पार्श्वभूमीवर शरद पवार यांनीही बारामतीकडे विशेष लक्ष दिले असून नातवासाठी ते मैदानात उतरले आहेत. त्याअनुषंगाने शरद पवार यांच्या सभांचे आयोजन करण्यात आले आहे. या सभांना ‘स्वाभिमानी सभा’ असे नाव देण्यात आले आहे. यातील चार सभा ग्रामीण भागात तर दोन सभा बारामती शहरात होणार आहेत. बारामती तालुक्यातील शिर्सुफळ, सुपा येथील बसस्थानकाजवळ, श्री क्षेत्र मोरगाव येथील हाॅटेल शिवतारा येथे, सोमेश्वरनगर करंजे येथे कारखाना रस्ता परिसरात शरद पवार यांच्या जाहीर सभा होणार आहेत. त्यामुळे शरद पवार या सभांच्या माध्यमातून काय बोलणार, याकडे पक्षाच्या कार्यकर्त्यांचे लक्ष लागले आहे.