scorecardresearch

बिबवेवाडी भागात वादातून तरुणावर वार करून पंजा तोडला

सुखसागरनगर भागात किरकोळ वादातून एका तरुणावर तीक्ष्ण शस्त्राने वार करण्यात आले. तरुणाच्या हातावर वार करण्यात आल्यानंतर त्याचा पंजा तुटला.

Bibvewadi attack on young man
बिबवेवाडी भागात वादातून तरुणावर वार करून पंजा तोडला (प्रातिनिधिक छायाचित्र)

पुणे : बिबवेवाडीतील सुखसागरनगर भागात किरकोळ वादातून एका तरुणावर तीक्ष्ण शस्त्राने वार करण्यात आले. तरुणाच्या हातावर वार करण्यात आल्यानंतर त्याचा पंजा तुटला. डाॅक्टरांनी शस्त्रक्रिया करून मनगटापासून तुटलेला पंजा पुन्हा जोडला.

अखिलेश चंद्रकांत कलशेट्टी (वय २२, रा. कात्रज) असे गंभीर जखमी झालेल्या तरुणााचे नाव आहे. याबाबत अभिजीत दुधनीकर ( रा. कात्रज) याने भारती विद्यापीठ पोलीस ठाण्यात फिर्याद दिली आहे. या प्रकरणी सहाजणांविरुद्ध गुन्हा दाखल करण्यात आला आहे. अभिजीत याचा काही दिवसांपूर्वी आराेपींशी वाद झाला होता. त्या वेळी अभिजीतने आरोपींविरुद्ध पोलिसांकडे तक्रार दिली होती. अभिजीत आणि त्याचा मित्र अखिलेश दुचाकीवरून बिबवेवाडीतील सुखसागरनगर परिसरातून निघाले होते. त्या वेळी सुखसाखरनगर परिसरातील खंडोबा मंदिराजवळ आरोपींनी दोघांना अडवले.

हेही वाचा – पुणे महापालिकेचे ९५०० कोटींचे ‘फुगवलेले’ अंदाजपत्रक; करवाढ नसल्याने पुणेकरांना दिलासा, सर्वाधिक खर्च पाणीपुरवठा योजनांवर

हेही वाचा – पुणे : पत्नीला तोंडी तलाक देणाऱ्या पतीविरुद्ध गुन्हा; ५० लाखांच्या मागणीसाठी विवाहितेचा छळ

आमच्या विरुद्ध पोलिसांकडे तक्रार करतो का? असे सांगून आरोपींनी अभिजीत आणि त्याचा मित्र अखिलेशवर हल्ला केला. अखिलेश याच्यावर शस्त्राने वार केले. अखिलेशनने वार हातावर झेलला. अखिलेशचा पंजा मनगटापासून तुटला. या घटनेची माहिती मिळाल्यानंतर पोलिसांनी घटनास्थळी धाव घेतली. अखिलेशला तातडीने रुग्णालयात दाखल करण्यात आले. डाॅक्टरांनी शस्त्रक्रिया करून मनगटापासून तुटलेला पंजा पुन्हा जोडला. सहायक पोलीस निरीक्षक घावटे तपास करत आहेत.

मराठीतील सर्व पुणे बातम्या वाचा. मराठी ताज्या बातम्या (Latest Marathi News) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.

First published on: 24-03-2023 at 15:42 IST

संबंधित बातम्या