scorecardresearch

Premium

मराठा आरक्षणासाठी आज मोठ्या हालचाली, छत्रपती संभाजीराजे दिल्लीत दाखल

मराठा आरक्षण आंदोलनाच्या पार्श्वभूमीवर छत्रपती संभाजीराजे आणि मराठा समाजाचे शिष्टमंडळ केंद्रीय मागासवर्ग आयोगाची आज भेट घेणार आहेत.

chhatrapati sambhajiraje in delhi, chhatrapati sambhajiraje to meet national commission for backward classes
मराठा आरक्षणासाठी आज मोठ्या हालचाली, छत्रपती संभाजीराजे दिल्लीत दाखल (संग्रहित छायाचित्र)

पुणे : मराठा आरक्षण आंदोलनाच्या पार्श्वभूमीवर छत्रपती संभाजीराजे आणि मराठा समाजाचे शिष्टमंडळ केंद्रीय मागासवर्ग आयोगाची आज भेट घेणार आहेत. मराठा समाजाला आरक्षण मिळावे या मागणीसाठी मनोज जरांगे पाटील यांनी आंदोलन केले होते. जरांगे पाटील यांनी राज्य शासनाला त्यासाठी काही मुदत दिली असून त्यांच्या आंदोलनाला यश मिळविण्यासाठी विविध घटक, नेत्यांकडून प्रयत्न सुरु आहेत. त्यासंदर्भात छत्रपती संभाजीराजे आणि त्यांच्या शिष्टमंडळाने महाराष्ट्र राज्य मागासवर्ग आयोगाची नुकतीच भेट घेतली होती.

हेही वाचा : नव्या वर्षात किमान सहा जोडसुट्ट्यांची मेजवानी

Thackeray Group MP Rajan Vikhares letter on occasion of Chhatrapati Shivaji Maharajs birth anniversary
“महाराज खरंच येऊन बघा… गुंड चाकू, सुरे, कोयते, तलवारी…”, ठाकरे गटाचे खासदार राजन विचारे यांचे छत्रपती शिवाजी महाराजांच्या जयंतीनिमित्त पत्र
Chief Minister Eknath Shinde's announcement about Maratha reservation Pune print news
राज्य सरकारला मराठा आंदोलनाची धास्ती; शिवनेरी किल्ल्यावरील शिवजयंतीच्या कार्यक्रमाच्या ठिकाणाबाबत घेतला ‘हा’ निर्णय
Chandgad BJP
कोल्हापूर : चंदगडमध्ये भाजपचा अजितदादा गटाला शह; शिवाजी महाराजांच्या पुतळा अनावरणातून राजकीय नाट्य रंगले
Shaurya Day is celebrated in the fort of Shirala where the liberation of Chhatrapati Sambhaji Raje was attempted
छत्रपती संभाजीराजेंच्या मुक्ततेचा प्रयत्न झालेल्या शिराळ्याच्या किल्ल्यात शौर्यदिन साजरा

मराठा समाजाला न्याय मिळावा, यासाठी सर्व स्थरावर संभाजीराजे मनोज जरांगे यांच्या आंदोलनाला पाठिंबा देत असून कायदेशीर प्रक्रिया माहिती असल्याने संभाजीराजे त्यासाठी पाठपुरावा करत आहेत. त्यासाठी छत्रपती संभाजीराजे आज दुपारी ३ वाजता दिल्ली येथील केंद्रीय मागासवर्ग आयोगात आयोगाचे अध्यक्ष हंसराज अहिर यांची भेट घेणार आहेत.

Latest Comment
View All Comments
Post Comment

Pune News (पुणे न्यूज), Maharashtra News, Marathi News (मराठीतील बातम्या) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.

Web Title: In delhi chhatrapati sambhajiraje and maratha delegation visit national commission for backward classes maratha reservation pune print news apk 13 css

First published on: 28-11-2023 at 11:17 IST

आजचा ई-पेपर : पुणे

वाचा
epaper image

संबंधित बातम्या

तुम्ही या बातम्या वाचल्या आहेत का? ×