scorecardresearch

Premium

पुणे : पावसात दुचाकी घसरली, अन् तो पीएमपीच्या चाकाखाली आला

पावसात दुचाकी घसरल्याने पीएमपी बसच्या चाकाखाली सापडून तरुणाचा मृत्यू झाल्याची घटना हडपसर भागात घडली.

Hadapsar area youth came under PMP bus
पुणे : पावसात दुचाकी घसरली, अन् तो पीएमपीच्या चाकाखाली आला (प्रातिनिधिक छायाचित्र)

पुणे : पावसात दुचाकी घसरल्याने पीएमपी बसच्या चाकाखाली सापडून तरुणाचा मृत्यू झाल्याची घटना हडपसर भागात घडली. प्रतीक विठ्ठल पवार (वय २३, रा. फुरसुंगी, हडपसर) असे मृत्युमुखी पडलेल्या दुचाकीस्वार तरुणाचे नाव आहे.

हेही वाचा – पुणे : तरुणींची छेड काढणारा ‘बकासूर’ अटकेत; कोयता जप्त

fire that broke out due to cylinder leakage
सिलिंडर गळतीमुळे आगीचा भडका उडून दोन जण जखमी
man dies while dancing during immersion procession
पुणे:विसर्जन मिरवणुकीत नाचताना एकाचा हृदयविकाराच्या झटक्याने मृत्यू
woman drowned in sleep nagpur
नागपूर : पावसाचे वाढते पाणी अन मृत्यू समोर… घरातच बुडाली आजारी महिला
dead, woman dies after drowning in water nagpur
नागपूर: घरात शिरलेल्या पाण्यात बुडून वृध्द महिलेचा मृत्यू, गिटटीखदानच्या महेशनगरातील घटना

हेही वाचा – आळंदीमध्ये डोळे येण्याची साथ;अवघ्या तीन दिवसात १६०० पेक्षा अधिक मुलांना लागण

दुचाकीस्वार प्रतीक फुरसुंगी भागातील खुटवड चौकातून निघाला होता. त्या वेळी खुटवड चौकात वळण घेताना पावसाच्या पाण्यामुळे रस्त्यात चिखल झाला होता. चिखलात दुचाकी घसरली आणि दुचाकीस्वार प्रतीक पडला. त्या वेळी भरधाव पीएमपी बसच्या चाकाखाली सापडून प्रतीकचा जागीच मृत्यू झाला. या प्रकरणी पीएमपी चालकाविरुद्ध हडपसर पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला अहे. प्रतीकच्या मागे आई आणि बहीण असे कुटुंब आहे, अशी माहिती पोलिसांनी दिली.

Latest Comment
View All Comments
Post Comment

Pune News (पुणे न्यूज), Maharashtra News, Marathi News (मराठीतील बातम्या) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.

Web Title: In hadapsar area where a youth came under the wheel of a pmp bus and died after his two wheeler fell in the rain pune print news rbk 25 ssb

First published on: 21-07-2023 at 17:28 IST

संबंधित बातम्या

मराठी कथा ×