पुणे : राज्याच्या अर्थसंकल्पामध्ये महिलांना महाराष्ट्र राज्य मार्ग परिवहन महामंडळाच्या सर्व प्रकारच्या बसच्या तिकीट दरात ५० टक्के सवलत देण्याची घोषणा करण्यात आली. त्यानुसार महामंडळाने १७ मार्चपासून महिला सन्मान योजना कार्यान्वित केली. या योजनेत २३ मार्चपर्यंत एसटीच्या पुणे विभागात एकूण ३ लाख १० हजार १३८ महिला प्रवाशांनी या योजनेचा लाभ घेतला आहे.

या बातमीसह सर्व प्रीमियम कंटेंट वाचण्यासाठी साइन-इन करा

जिल्ह्यात शिवाजीनगर आगारातून १६ हजार ९०२, स्वारगेट १५ हजार ५५८, भोर २७ हजार १९२, नारायणगाव ५२ हजार ८८, राजगुरुनगर ४१ हजार ५३१, तळेगाव १४ हजार १०५, शिरुर १९ हजार ५२२, बारामती ४० हजार ९५२, इंदापूर ३२ हजार ३०९, सासवड १५ हजार ८१७, दौंड १० हजार २५६, पिंपरी-चिंचवड ८ हजार ९९६, एमआयडीसी १४ हजार ९१० असे जिल्ह्यात एकूण ३ लाख १० हजार १३८ महिला प्रवाशांनी या योजनेचा लाभ घेतला आहे. यातून एसटी महामंडळाला ८९ लाख १४ हजार १३८ रुपयांचे उत्पन्न मिळाले आहे.

हेही वाचा – अभियोग्यता चाचणीचा निकाल जाहीर, परीक्षा परिषदेचे संकेतस्थळ ‘हँग’

हेही वाचा – आरटीई प्रवेश अर्जांसाठी आज शेवटचा दिवस

एसटी महामंडळाच्या माध्यमातून समाजातील विविध घटकांना ३३ टक्क्यांपासून १०० टक्क्यांपर्यंत प्रवासी तिकीट दरात सवलत देण्यात येते. यापूर्वीही स्वातंत्र्याच्या अमृत महोत्सवानिमित्त राज्य सरकारने ७५ वर्षे पूर्ण झालेल्या ज्येष्ठ नागरिकांना एसटीच्या सर्व प्रकारच्या बसमधून मोफत प्रवासाची सवलत जाहीर केली आहे. तसेच ६५ ते ७५ वर्षाच्या ज्येष्ठ नागरिकांना एसटीच्या सर्व प्रकारच्या बसच्या तिकीट दरात ५० टक्के सवलत देण्यात येत आहे. या सवलतींची प्रतिपूर्ती रक्कम राज्य शासनाकडून महामंडळाला देण्यात येत आहे, अशी माहिती पुणे विभागीय नियंत्रक रमाकांत गायकवाड यांनी दिली.

Pune News (पुणे न्यूज), Maharashtra News, Marathi News (मराठीतील बातम्या) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.
Web Title: In one week three lakh women travel with fifty percent discount pune print news stj 05 ssb
First published on: 25-03-2023 at 00:59 IST