पिंपरी : शहर पोलीस दलातील चिंचवड पोलीस ठाण्याचे वरिष्ठ निरीक्षक जितेंद्र कोळी, दिघीचे विजय ढमाळ आणि तळेगाव एमआयडीसीचे अंकुश बांगर यांना नियंत्रण कक्षाशी संलग्न करण्यात आले आहे. तर, दोन पोलीस निरीक्षक, दहा सहायक पोलीस निरीक्षक आणि ११ पोलीस उपनिरीक्षकांच्या अंतर्गत बदल्या केल्या आहेत.

शिरगाव परंदवडी पोलीस ठाण्याचे पोलीस निरीक्षक दिगंबर सूर्यवंशी यांची गुन्हे शाखेत तर त्यांच्या जागी निगडीच्या पोलीस निरीक्षक (गुन्हे) तेजस्विनी कदम यांची बदली झाली आहे. तर नियंत्रण कक्षातून दहा सहायक निरीक्षक, ११ उपनिरीक्षकांना विविध ठिकाणी नेमणूक देण्यात आली आहे.

हेही वाचा : पिंपरी-चिंचवडमध्ये डेंग्यूचा डंख वाढला

सहायक पोलीस निरीक्षकांमध्ये अभिनय थोरात (गुन्हे शाखा), मधुकर पवार (वाहतूक शाखा), युवराज कलगुटगे (सांगवी), तानाजी कदम (निगडी), ज्योती तांबे (विशेष शाखा), सुभाष चव्हाण (वाकड), नवनाथ मोटे (चिखली), आसाराम चव्हाण (वाहतूक शाखा), गणपत धायगुडे (चाकण),जोहेब शेख (देहूरोड) पोलीस ठाण्यात बदली झाली आहेत. तर, पोलीस उपनिरीक्षक अशोक शिर्के (निगडी), बाबासाहेब साळुंखे (वाकड), लक्ष्मण आकमवाड (सांगवी), पंकज महाजन (भोसरी), मयुरेश साळुंखे (गुन्हे शाखा), सारंग ठाकरे (हिंजवडी), शुभांगी मगदूम (दिघी), अनिस मुल्ला (महाळुंगे), ज्ञानेश्वर धनगर (वाहतूक शाखा), अनिता दुगावकर (देहूरोड) आणि महेंद्र सपकाळ (वाहतूक शाखा) यांची बदली झाली आहे.